0
4
8
2
8
6
प्रेमाचं ऑडिट
असतं का करायचं
कधी ऑडिट प्रेमाचं
व्यवहार आणि भावना
यांचं कसं जमायचं?
प्रेम आतून फुलतं
अंतरात्म्यातून जन्मतं
प्रेमाला उपमा नसते
ते स्वर्गीय लेणं असतं
प्रेमात असतो त्याग
समर्पणाची भावना
जळत्या ज्योतीवर
पतंग झेप घेतो ना!
कमलिनी च्या प्रेमात
भुंगा आकंठ बुडतो
बंद पाकळ्यांत कसा
स्वत:ला जखडून घेतो
प्रेम खळाळता झरा
प्रेम श्रावण हसरा
राधा कृष्णमय असा
निळा प्रणय नाचरा
प्रेम असतं अमर्याद
अथांग आणि अपार
भूमीवर पांघरलेलं
जसं आभाळ निळशार
जर कुणी मांडलच
कधी ऑडिट प्रेमाचं
नफा तोटा नसेल तिथं
दिसेल विश्व दातृत्वाचं
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
=============
0
4
8
2
8
6



