आवास मधील विद्यार्थांना पोलीसांतर्फे स्वसंरक्षणात्मक मार्गदर्शन
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शिबीराचे आयोजन
आवास मधील विद्यार्थांना पोलीसांतर्फे स्वसंरक्षणात्मक मार्गदर्शन
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शिबीराचे आयोजन
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: गुरुवार दि. २२ अॉगस्ट २०२४ रोजी आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मधील इ. ११ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना सकाळ सत्रात मांडवा सागरी पोलिस ठाणे यांचे मार्फत स्वसंरक्षणात्मक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक पोलिस दिनेश थळे, पोलिस उपनिरीक्षक जे.आर.पाटील, पोलिस हवालदार अमित पाटील, महिला पोलिस हवालदार अस्मिता करावडे हे सर्व जण उपस्थित होते. तसेच या मार्गदर्शन चर्चासत्रास मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
पोलिस उपनिरीक्षक जे.आर.पाटील व पोलिस हवालदार अस्मिता करावडे यांनी विद्यार्थ्यांना समाजामध्ये व शाळेमध्ये वावरताना कोणती दक्षता घ्यावी, स्वसंरक्षणासाठी आपल्याला कोणत्या कृती करता येतील, Good Touch – Bad Touch, 112 Help line Number, POCSO Act 2012 याविषयी माहिती करून दिली व विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले . तसेच या सर्व टिम ने मा.मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर, यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती दक्षता घेतली जावी, कोणत्या उपाय योजना करण्यात याव्या याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच आलेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत राणे, संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वर्गांमध्ये व विविध ठिकाणी सी.सी. टि.व्ही. कॕमेरे बसवल्या बद्दल त्यांचे विशेष कौतुक केले, आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन धनराज फड सर यांनी तर आभार प्रदर्शन कैलास शिकारे सर यांनी केले.
दुपार सत्रात मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी इ. ५ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना समाजामध्ये व शाळेमध्ये वावरताना कोणती दक्षता घ्यावी, स्वसंरक्षणासाठी आपल्याला कोणत्या कृती करता येतील याविषयी माहिती करून दिली व विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.



