महर्षी कर्वे शिक्षण संस्था स्थापना दिवस
व्हीजन इंग्लीश मिडियम शाळेत कार्यक्रम साजरा
महर्षी कर्वे शिक्षण संस्था स्थापना दिवस
व्हीजन इंग्लीश मिडियम शाळेत कार्यक्रम साजरा
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील थोर शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली पुण्यातली प्रसिध्द शिक्षण संस्था, “महर्षी कर्वे शिक्षण संस्थे” चा १२८वा स्थापना दिन दि.१४ जून शुक्रवार रोजी व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये उत्साहात सादर करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, श्री. प्रदीप नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी संस्थेच्या कार्याचा इतिहास व सध्याचे संस्थेचे कार्य याबद्दलची एक चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. इयत्ता आठवीची विद्यायर्थिनी राधिका दीक्षित हिने संस्थेच्या व्हिजन इंग्लीश मिडियम शाळेविषयी आपल्या भावना विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून व्यक्त केल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ममता अग्रवाल आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा कारळे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. विद्यार्थी, पालक व वडगाव शेरीतील मान्यवर नगरीक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ मनीषा सुरवसे यांनी आभार मानले. ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.



