0
4
8
2
9
0
बाबा
शांत शीतलता देणारा
माझा चंद्र तू..
प्रकाश ऊर्जा देणारा
माझा रवी तू..
तमात मार्ग दाखवणारी
माझी मशाल तू..
भीती कापणारी सळसळती
माझी समशेर तू..
संकटी रक्षणकवच बनणारी
माझी ढाल तू..
रणी जीवनसंजीवनी देणारा
माझा मेघ तू..
जीवनी कणखर बनवणारा
माझा वज्र तू..
जीवनपथी दीपस्तंभ होणारा
माझा गुरू तू..
देव्हाऱ्यात सतत जळणारी
मम समईची वात तू
प्रत्येक स्पंदन जाणणारा
माझा हृदय तू…
किती किती वर्णू तुझी रूपं ही
सारी शब्दमहिमा तुजपुढे फिकी
बाबा.. तूच माझं अस्तित्व
तुजविणं वाटे जीवन बंदिस्त
तुझा रितेपणा जाणवतोय कणाकणात
सारे दुःख झेलते आता एकटी या जगात
तारका रुखमोडे
अर्जुनी /मोर.जि.गोंदिया
=======
0
4
8
2
9
0



