Breaking
ई-पेपरकवितानागपूरवर्धाविदर्भसाहित्यगंध

स्वागत नववर्षाचे

पवन सु. किन्हेकर बोरगाव, जि.वर्धा

0 5 1 7 5 8

स्वागत नववर्षाचे

करू स्वागत नववर्षाचे
गुढीपाडवा सण आला
उभारू गुढी मांगल्याची
जल्लोष मराठी नववर्षाला ||

सुख समाधान शक्ती आरोग्य
प्रेम आनंद लाभो संपदा ऐश्वर्य
भराभराटीचा काळ येवो
प्रकाशो जीवनी नव सूर्य ||

शेतकऱ्यांचे कामकऱ्यांचे
पिकधान्ये समृद्ध हर्षाने बहरो
लक्षावधी दिप तेज झळोझळो
दशा तिमिर संकट सरो ||

अभिमानाने लहरीत गुढी
स्वागता साखरगाठी गोडी
भगवी पताका उंच शिखरी
वैभवे दिव्य शोभे माडी ||

दारी आंबतोरणे बांधियले
नभी रेखिते चांदण रांगोळी
‘पवन’ म्हणे सुंदरमय संस्कृती
नववर्षदिनी चैतन्य भुस्थळी||

पवन सु. किन्हेकर
बोरगाव, जि.वर्धा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे