‘आवास’मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

‘आवास’मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग/ रायगड: (दि १ ऑगस्ट) आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०६ वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व प्रतिमेचे पूजन केले. तसेच उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची महती सांगितली.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशिष राणे सर यांनी केले. इ. ५ वी ते इ. १२ वी च्या वर्गशिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची माहिती सांगितली.



