0
4
8
2
9
7
जन्म बाईचा
रांधा वाढा उष्टी काढा
अडकला जन्म बाईचा
थोडी कुठे घेता भरारी
विळखा मोहपाशाचा
करायचे ते काही कर
अवकाश सारे फिरून घे
पण जाण्याआधी प्रिये
जेवण तयार करून दे
तूला काय करायचं ते कर
सूट सगळी माझ्याकडून
बाळाचं तेवढं बघत जा
आकांत करतं रडून रडून
आईचे सारखे पाय दुखतात
काम तिला झेपत नाही
मोलकरणीच्या हातचे
जेवण तिला रूचत नाही
असा हां जन्म बाईचा
तारेवरची कसरत सारी
धावत असते तरीही हसते
आहे की नाही कमाल भारी
सविता धमगाये
ता. जि.नागपूर
0
4
8
2
9
7



