Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्र

आयुष्यातील ध्येय निश्चितीसाठी ‘या’ चार गोष्टीची जाण असावी; अतुल झेंडे

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 0 8 9 0

आयुष्यातील ध्येय निश्चितीसाठी ‘या’ चार गोष्टीची जाण असावी; अतुल झेंडे

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: करिअर निवडताना तो आवडीचा निवडणे गरजेचे आहे कारण त्यावर पुढील आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे आयुष्यातील ध्येय निश्चित केले तर ते सोडता कामा नये. यासाठी आयुष्यात चिकाटी महत्वाची असते. याचबरोबर ईच्छाशक्ती, आपल्यात नेमकी कुठली कमतरता आहे, उपलब्ध संधी आणि आव्हाने या चार गोष्टीची जाण असणे अत्यंत महत्वाचे आहे. असे रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएन व अश्विनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श भवन येथे विद्यार्थी गुण गौरव सोहळा कार्यक्रमात केले.

यावेळी व्यापीठावर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. गौतम पाटील, अलिबाग माजी उप नगराध्यक्ष सुरक्षा शाह, हरेश देशमुख ,अश्विनी मेहता, रायगड असोसिएशन उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष तुषार थळे , उपाध्यक्ष राकेश दर्पे, खजिनदार विवेक पाटील, सेक्रेटरी विकास पाटील, सह सचिव अमोल नाईक, कार्याध्यक्ष सुदेश माळी, अमर मढवी, विजय पाटील, निलेश दुदम, सल्लागार सुरेश खडपे, मनोज पाटील, अभी काटकर, विराज घरत, गणेश जाधव, जितू शिगवण. रमेश कांबळे, हर्ष दर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांना संबोधित करताना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले की,मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. अनेक वेळा पालक आपल्याला हवे ते क्षेत्र निवडण्यास मुलांना भाग पाडतात. परंतु, मुलांची क्षमता, कुवत आणि इच्छा यांचा विचार पालकांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मुलं जे क्षेत्र निवडतील त्यात त्यांना समाधान मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि शैक्षणिक आयुष्यात समतोल येईल. याचप्रमाणे जीवनात बदल, सकारात्मक दृष्टिकोन, नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द, मेहनत, कष्ट, अपयशाशी सामोरे जाण्याची ताकत या गोष्टी मुलांमध्ये असल्या तरच त्यांचे अस्तित्व कायम राहील.

आमच्या काळात असणारी शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धत ही वेगळी आहे. आज जे सत्कार स्वीकारत आहेत.ते उद्या सत्कार देणारे असतात . ग्रामीण भागात मुलामध्ये जी चिकाटी आहे ती कोणाकडे नाही.आपल्याकडे काही कमी नाही. शहरी भागातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यात फरक आहे.मी शिक्षण घेतले तेव्हा तीन किलो मीटर पायी जात होतो.1935 साली शिक्षण पद्धती स्वीकारली आहे. विद्यार्थीयांचे दहावी नंतर करियर करू असे शकतात.
माझे निवड 2010 मध्ये झाले नंतर निवड पाहण्यासाठी तीन तास लागले होतें. आता काही सेकंदात निकाल पाहता येते. तंत्रज्ञान हा वरदान रुपी राक्षस आहे. ज्या गोष्टीचा वापर करत नाही ती गोष्ट आपल्याकडे रहात नाही.
मोबाईल नव्हते तेव्हा लिखाणाची कला अवगत होती. मात्र मोबाईल आल्यामुळे लिखाणाची सवय कमी होत गेली आहे.

तंत्रज्ञान हे माणसाच्या हातांनी निर्माणकर्त्याला आपल्या प्रतिमेच्या देणगीद्वारे बनवले गेले आहे, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी स्पार्कची देणगी, शून्यातून किंवा कल्पनेतून काहीतरी बनवण्याची क्षमता आहे. मात्र त्याचा वापर किती करायचा आणि किती करू नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.आज सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात बदल घडत आहे. त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. शिक्षण पद्धती बदलत चालल्या आहे. ‘मल्टी डिसिप्लिनरी’ संकल्पना म्हणजेच एक क्षेत्र निवडून विविध विषयांचे ज्ञान मुलांना मिळत आहे. अशा प्रकारचे शिक्षण काळाची गरज देखील आहे. त्यामुळे बदलत्या युगात आवडीनुसार क्षेत्र निवडणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही तर चांगला माणूस घडविण्यासाठी आणि माणसाचा विकास होण्यासाठी आहे,

आजच्या काळात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे असते, पण यशस्वी जीवनासाठी आपण वेळेवर योग्य करिअर निवडणे गरजेचे आहे. कारण त्यावरून आयुष्याची पुढची दिशा ठरते. यामुळे तुमचे शिक्षण, वय आणि लक्ष्य यावरून तुम्हाला करियर निवडण्यासाठी करियर काऊन्सलिंग करून घेणे महत्वाचे आहे. आपल्या पासून मुबई जवळ आहे गावाकडे अशी पद्धत आहे की गावच्या बाहेर जायचे नाही. कब्बडी, क्रिकेट, आणि बैल गाडा या तीन गोष्टीमुळे बाहेर जाण्यास तयार होत नाही.मुलामध्ये खेळामध्ये रस असावा मात्र तो अती ही नसावा यासाठी पालकांनी सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.

यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड गौतम पाटील यांनी सांगितले की,दहावीला चांगले मार्क मिळतात मात्र बारावीला त्याची टक्केवारी घसरली जाते दहावीला टक्केवारी जास्त मिळाली तरी प्रथम पालकांनी मुलांना कोणत्या विषयात आवड आहेत त्यामध्ये त्यांना प्रवेश द्यावा जेणे करून विद्यार्थी आवड निर्माण होईल. महाविद्यालयात आम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो. मात्र मुले ही मुबई, पुणे येथे जाण्यासाठी तयार होत नाही. हर्षद जुईकर ह्याला गुगलचे प्लेसमेंट आहे तो आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे याचा अभिमान आहे. गुणवंत विद्यार्थी हा आई-वडील यांच्यासाठी अभिमान आहे. करियर करता येतो. पालकांनी मुलांवर दडपण न देता त्याच्या आवडी कडे लक्ष देण्याची विंनती केली. आलेल्या संधीचा सोने करून घ्या संधी परत येत नाही. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शैक्षणिक क्षेत्राबरोबरच व्यावसाय़िक क्षेत्रामध्ये दररोज नवनवीन कोर्सेस आणि रोजगाराच्या संधींची भर पडत आहे. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणाईला पावला पावलांवर वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या नवनवीन संधी खुणावू लागल्या आहेत.

यामुळे नक्की काय करायचं ? कुठे जायचं? या संभ्रभात अडकलेल्या तरुण पिढीकडून कळत नकळत बऱ्याचदा चांगल्या संधी हातातून निसटतात. पण अशा परिस्थितीत जर तरुणांनी योग्य करिअर मार्गदर्शन घेतले तर योग्यवेळी संधीचे सोने करणे त्यांच्यासाठी कठीण नाही. करिअरमध्ये यश मिळवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास पाटील व आभार प्रदर्शन अमोल नाईक यांनी केले. तर सूत्रसंचालन वेदांत कंटक यांनी केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे