Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

नाजूक नाते

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे

0 4 8 2 5 1

नाजूक नाते

ज्या वेळी मुलाचे लग्न होते व सून म्हणून घरात नवे कोणीतरी येते, तेंव्हा मुलाची भूमिका अवघड होते. आईने इतक्या दिवस लाडात वाढवलेला आपला मुलगा सुनेच्या ताब्यात देते त्यावेळी तिच्या मनाला थोडे तरी दुःख होते.आता आपला मुलगा आपला राहणार नाहि असे तिला वाटते. अशा वेळी मुलाने 50/50 % आपल्या आईला, बायकोला समान वेळ द्यावा.बायकोला सर्व घर, घरातील माणसे नवीन असतात अशा वेळी तिला समजून घ्यावे. तिने सर्वाना वेळ द्यावा तिलाही सर्व समजून घेतील.

आई, मुलीसारखे नाते जपावे. प्रत्येक मुलगी कधी तरी सासरी जाणार आहे. अशावेळी तिने सासरी मुलगी बनून रहावे. सासूने तिला मुलीसारखे जपावे. मुलीच्या आईने तिच्या संसारात डोकावू नये. तिला तिचे पाहू द्यावे. जिथे मुलीला त्रास होईल तिथे मात्र तिच्या पाठीशी उभे रहावे. जीवनात पुढे आईने बायकोला नीट वगवले नाही किंवा बायको सर्वाबरोबर नीट वागत नाहि हे दिसून आले तर खोल विचार करावा. समजूत सर्वांचीच काढावी.

कोणताही निर्णय घेताना अविचाराने घेऊ नये. उदा – डिवोर्स घेणे, मुलीचा राग राग करणे, आईला उलट बोलणे अशा प्रकारे…एवढेच मला सांगायचे आहे. दोन्ही बाजू तपासाव्यात. कधी कधी आईकडे पण चूक असू शकते.कधीकधी बायकोकडे चूक असते. यामुळे या नात्यात वाद होतात. घरातील कलह वाढत जातात. मनातील जिव्हाळा कमी होतो. खरे तर मुलाला आई, बायको दोघीना छान जपायचे आहे. काही गोष्टी आवर्जून कराव्यात.. उदा- बायकोला बाहेर नेताना “आम्ही या ठिकाणी जाऊन येतो.”असे बोलले तरी आई खूष होते. आल्यावर तिची विचारपूस करा. आणलेल्या वस्तू दाखवा. ती खूष होणार. अगदी सोपे आहे.

कधीतरी फॅमिली ट्रीप काढा. सर्व बरोबर जा. असे छोटे नियम पाळावेत.आपल्या मुलीसारखी वागणूक द्यावी. सून आली म्हणून काम करणे सोडून देऊ नये.काम म्हणजे आपल्याच शरीराला होणारा व्यायाम आहे. तर असे हे सासू – सून नाजूक नाते मनापासून जपले तर जीवनबाग आनंदाने फुलते. घरातील सर्व सुखी राहतात. येणारी सून आपली म्हणून बघा.. मग सर्व छान होतेच…!

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे