‘आशांजली ‘ डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे 266 वे पुस्तक प्रकाशित
वसुधा नाईक पुणे, प्रतिनिधी

‘आशांजली ‘ डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे 266 वे पुस्तक प्रकाशित
वसुधा नाईक पुणे, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
पुणे: 25 एप्रिल 2026 सांजभेट, एम प्रकाशन आणि मधुस्वर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय कीर्तिचे कलावंत, साहित्यिक, संपादक सुलेखनकार सबकुछ डाॅ.मधुसूदन घाणेकर लिखित आशा भोसले यांच्या स्वरजीवनावर आधारीत पुस्तकाची ख्यातनाम गायिका डाॅ.रोहिणी काळे यांच्या शुभहस्ते नुकतेच साहित्यिक, कलावंत मेळाव्यात जाहिररित्या प्रकाशन करण्यात आले.तसेच डाॅ.घाणेकर संपादित ‘ विश्वविक्रमी ‘ डहाळी’ या अनियतकालिकाच्या 1108 व्या विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाईक यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष मधुकर्णिका सासवडे यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. “आशा भोसले यांनी आठ दशकांहून अधिक काळ संगीतासाठी मौलिक योगदान दिले.त्यांच्या निधनाने नियतीकडून सप्तस्वर हिरावले गेले या शब्दात डाॅ.घाणेकर यांनी आशाजींना श्रध्दांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि डाॅ.रोहिणी काळे यांनी ओ.पी.नय्यर यांनी स्वरबध्द केलेली आशाजींची काही गाणी सादर केली. याप्रस॔गी कलावंत आशालता काळे संजय जोग, गजानन जाईल, अरविंद लोखंडे, राजेन्द्र आपटे, विलास जोशी तसेच नीला विद्वांस, जयश्री शेंडगे, नंदकिशोर गावडे आदि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
समारंभाचे औचित्य साधून दत्तोपासक स्व.ताई घाणेकर स्मृतीमंच तर्फे डॉ. रोहिणी काळे आणि संजय जोग यांना संस्थापक, अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग यांनी समारोप केला.



