Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रराजकिय

ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचा जि. प. अध्यक्षांकडून सन्मान

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 2 4 6 1

ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचा जि. प. अध्यक्षांकडून सन्मान

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (दि २४ मार्च) रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. मंगेश वाकडीकर यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे चौली गवळी समाजातर्फे अभिनंदन करण्यासाठी गवळी समाजाचे अध्यक्ष राजैश मेहतर , सेक्रेटरी प्रफुल्ल वालेकर व येष्ठ पत्रकार श्री. बळवंत वालेकर जि. प. अध्यक्षांच्या दालनात गेले होते.

यावेळी जि.प. सदस्य तथा अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आमित नाईक अध्यक्षांसमवेत होते. ज्येष्ठ पत्रकार वालेकर सर यांना दालनात पाहताच अमित नाईक जि. प. अध्यक्षांना म्हणाले ” पत्रकार वालेकर सर हे जुन्या पिढीतील पत्रकार असून त्यांनी लेखणीच्या फटका-ने जिल्ह्यात अनेक कामे केली आहेत. सागरगड – माची येथील आदिवासींना शासनातर्फे रस्ता , वीज , पाणी मिळवून दिले.

ठाणे येथे असलेले पासपोर्ट
* कार्यालय अलिबागेत आणले तसेच ठाणे ये थे असलेले *जिल्हा कामगार न्यायालय* अलिबाग येथे स्थलांतरित केले. म्हणून त्यांचा सन्मान करावयास हवा.”. लगेचच जि. प. अध्यक्ष वाकडीकर बुके देऊन सन्मान करताना म्हणाले
* “वालेकर सरांनी अनेक कामे केली आहेत . पनवेल तालुक्यात बाहुसःख्य
* ” आदिवासी वाड्या वन विभागात आहेत . तेथील जमीन डीफाँरेस्ट करण्यासाठी आम्हाला. पत्रकार वालेकर सरांनी सहकार्य करावे ” यावेळी योग्य ते सहकार्य करण्याचे वालेकरा सर यांनी मान्य केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे