0
4
8
2
9
7
अशी असावी कविता
अशी असावी कविता
वाचकांच्या मनाला भुलविणारी ॥
वास्तवाच्या झुल्यावर
यथेच्छपणे झुलविणारी॥॥॥॥
अशी असावी कविता
निसर्गाशी जवळीक साधणारी॥
हिरवाईच्या वर्णनाने
सृष्टीशी नाते सांगणारी ॥॥॥॥
अशी असावी कविता
दुःखितांचे दुःख जाणणारी ॥
गरीबांच्या सकल व्यथा
समर्पक शब्दात मांडणारी ॥॥॥॥
अशी असावी कविता
कल्पनेला पंख लावणारी ॥
मनासारखीच क्षणार्धात
आकाशापर्यंत धावणारी ॥॥॥॥
अशी असावी कविता
आपल्याच मनाचे गूज बोलणारी ॥
आपल्याच भावनांना
अलगदपणे तोलणारी॥॥॥॥
डाॅ. नझीर शेख राहाता
0
4
8
2
9
7



