Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

मला आवडलेले पुस्तक – मृत्युंजय

कुसुमलता दिलीप वाकडे

0 5 6 4 4 2

मला आवडलेले पुस्तक – मृत्युंजय

‘मृत्युंजय’ या कांदबरीचे लेखक शिवाजी सावंत यांनी दानशूर, दिग्विजय, अशरण, सूर्यपुत्राची कहाणी मृत्युंजय या पुस्तकात लिहिलेली आहे. भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार याला मिळाला आहे. 31ऑगस्ट 1940 साली कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावी एका शेतकरी कुंटुबात शिवाजी सावंताचा जन्म झाला. परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम ठोकून त्यांना वाणिज्य विषयाच्या लघुलिपी आणि टंकलेखन यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला.कोल्हापुरात राजाराम प्रशालेमध्ये त्यांनी अध्यापक म्हणून 20 वर्ष सेवा केली. तेथून परसेवेवर पुण्यात येऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याच्या ‘लोकशिक्षण’ मासिकाकडे त्यांनी सहा वर्ष काम पाहिले.ही कांदबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी सतत सहासात वर्ष “मृत्युंजय” चा त्यांनी अभ्यास केला कथानायक कर्णाची संदर्भंभूमी म्हणून त्यांनी मध्य भारत,उत्तर भारत,पंजाब, हरियाना व हिमाचल प्रदेश अशा विस्तृत प्रदेशाचा डोळस प्रवास केला.प्रदीर्घ संदर्भशोधन,सखोल व उलटसुलट चिंतन, मनन आणि डोळस प्रवासाने पकडलेले प्रत्ययकारक निरीक्षण यातुनच या प्रदीर्घ व रसपात्र कांदबरीचा जन्म झाला.

1974 सालीच भारतीय ज्ञानपीठ दिल्ली या विख्यात प्रकाशन संस्थेने मृत्युंजयचे हिंदीत भाषांतर प्रकाशित केले आहे. मृत्युंजयची कन्नड 1990, गुजराथी 1991 व मल्याळम 1995 अशी भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. 1989 मध्ये मृत्युंजयचे कलकत्त्यातील प्राध्यापक पी.लाल यांनी इंग्रजीत भाषांतर प्रसिद्ध करून ही मूळ मराठी कर्णगाथा आता आंतरराष्ट्रीय साहित्यात नेण्याचे ऐतिहासिक कार्यही केले आहे. शिवाजी सावंतानी लिहिलेल्या हया कांदबरीत कर्णाच्या जीवनाचे विविध पैलू पाहावयास मिळतात. “कर्ण म्हणतोय लोक दचकतील, “म्हणतील कालवश माणूस केव्हापासून बोलायला लागला जेव्हा जेव्हा हाडामांसाची जिवत माणसं मतांसाठी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं!” कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मघाचे मधुर चषक असावेत. नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत, स्त्री-पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगन असावीत. क्षणभंगुर जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या माझ्या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत मनाला हळुवारपणं गुदगुदल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम! निरनिराळया भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम!

मी सूर्यपुत्र, कुंतीपुत्र पण हे कुणालाच सांगू शकत नव्हतो. माझे लालनपोषण आई राधा व बाबा अधिरथ यांच्या चंपानगरीत वाढलो. जन्मताच असलेली माझ्या कानातील स्वर्णं कवच कुंडलाचे सर्वाना वेध व चर्चचा विषय होता. संपूर्ण कलेत पारंगत असून सुध्दा पावलोपावली कर्णाचा अर्थात माझा अपमान व्हायचा. भीष्म पितामह काही बोलू शकत नव्हते. तर माझ्याच हातुन गेलेला बाण पक्षीणवर नेम धरून मारला होता; पण द्रोणाचार्यानी अजिंक्यपदाची माळ अर्जुनाच्या गळ्यात टाकली होती. कौरव-पांडवाचे शल्य कर्णालाच भोगावे लागत होते.एकदा राजसभेत दुर्योधनाने द्रौपदीला वश करण्याची कल्पना मांडली शकुनीमामा कपटी कल्पना सुचवू लागले. एकटा दुर्योधन सोडला तर इतर सर्वजन माझ्याकडं मनापासून अंगराज म्हणून पाहत होते काय? दुर्योधनाविषयी माझ्या मनात आदरभाव होता. तरीही कित्येक वेळा मला त्याच्या योजना आणि कल्पना मुळीच पटत नसत.

हस्तिनापुरात महायुद्धाची तयारी सुरू झाली. माझ्या आयुष्यातील हे तिसरं महायुद्ध होतं! पहिलं पांचालीच्या स्वयंवरात अनेक राजानी मिळून कांपिल्यनगरात मांडलेले ! दुसरं युवराज्ञी भानुमतीचं युवराज दुर्योधनानं हरण केल त्या प्रसंगी मला लढावं लागलेलं! “वृषाली, तुझं सौभाग्यलेणं रहिल!” हातातील बाण डाव्या अंगठयात टोचून त्यावर तळलेला एक टपोरा रक्तबिंदू मी उजव्या अंगठयानं तिच्या विशाल भारी चढविला! ती त्या कुंकुमतिलकानं कितीतरी सुंदर दिसत होती!इंद्राला कवच-कुंडल दान करण्यात कर्ण चुकला म्हणणार्‍यांना काय कळणार की या वेळी अंगावर अभेघ कवच असतं तर- तरी वृषालीच्या भारी तसला मंगल तिलक लावण्याच्या भाग्याला मुकलो असतो.

युध्दाचा सतरावा दिवस उजाडला. शुध्द तृतीयेचा दिवस होता तो, दोन्ही पक्षाकडील सैन्यसंख्या आता अर्ध्याहून अधिक कमी झाली होती. पाच घोडयाचे हातातील वेग कर्णात आलयं होतय काही सुचत नव्हत अर्जुनाचं आज काही खर नव्हत्यं . नि:शस्त्र पाहून मात्र अर्जुनासारखा गांडीव धनुष्यही खाली घेतलं नि:शास्त्रावर शस्त्रफेक कशी करायची, तेवढ्यात श्रीकृष्णाने तर्जनी कर्णाच्या कंठाच्या दिशेने अचुक रोखत म्हणाला,”अर्जुना वेध साध!”डोळ्यातून अंतिम वंदन करीत. अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि भीमाच्या खांद्यावरील गदा आता थरथरत होती! झापडणारे कर्णाचे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले ऊं…भूभूँव:स्व…तत्सsss ओठाची हालचाल बंद पडली. त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं!शिवाजी सावंतानी 1975 साली लिहिलेले मृत्युंजय ही कांदबरी मी वयाच्या 21 व्या वर्षी अर्थातच 1986 ला मी डी.एड् ला असतानाच प्रथम वाचली. पण मला आता त्याचा सार न सार कळला ‘मृत्युंजय’ ही कांदबरी माझ्या ग्रंथसंग्रहालयात बर्‍याच पुस्तकापैकी ही एक आवडती कांदबरी म्हणून जतन केलेली आहे.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी, उमरेड रोड, नागपूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 4 4 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे