नागपुरात ऑल इंडिया समता सैनिक दलतर्फे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
नागपुरात ऑल इंडिया समता सैनिक दलतर्फे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न
महामाया बुद्ध विहार वैभव नगर येथे प्रशिक्षणाचे भव्य आयोजन
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि ७ जुलै) : शहरात ऑल इंडिया समता सैनिक दल जिल्हा नागपूर तर्फे दिनांक सहा जुलै 2025 रोजी महामाया बुद्ध विहार वैभव नगर, नागपूर येथे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
आदरणीय एल. आर. बाली जी यांच्या स्मृतीदिना निमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे शारीरिक प्रशिक्षक आदरणीय भीमरावजी म्हैसकर यांनी ध्वजारोहण करून सैनिकांनी पथसंचलन आणि जय भीम सॅल्यूट (झेंडा सलामी) कसे करावे याचे प्रशिक्षण दिले. बौद्धिक प्रमुख महिला विंग आदरणीय रंजनाताई वासे यांनी महिलांचे प्रश्न आणि समस्या यावर मार्गदर्शन केले.
आदरणीय कांतीलालजी भांगे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र यांनी समता सैनिकांची भूमिका कार्य आणि जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. आदरणीय जे. ई. शेंडे केंद्रीय कोषाध्यक्ष यांनी शाखेचा रेकॉर्ड आणि देखभाल कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. आदरणीय उज्वला उके प्रदेश सचिव महिला विंग यांनी बालक आणि युवकांना ऑल इंडिया समता सैनिक दलात जोडण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
आदरणीय चहांदे गुरुजी ज्येष्ठ मार्गदर्शक ऑल इंडिया समता सैनिक दल यांनी दलाप्रती आपली निष्ठा कशी असावी यासंबंधी मार्गदर्शन केले. आदरणीय राहुल सोमकुवर जिल्हा अध्यक्ष यांनी अध्यक्षपदावरून बोलताना दलाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदरणीय सारिका हुमने आणि आदरणीय अमित इंदुरकर यांनी केले.
यावेळी नवीन सैनिक शोभिता कांबळे शिक्षिका प्राथमिक शाळा नेवरी पंचायत समिती कुही यांनी मनोगत व्यक्त केले. उपरोक्त कार्यक्रमात महिला विंग अध्यक्ष सविता धमगाये, सैनिक अनिता बनकर, लोकेश ताकसांडे, गायत्री नारनवरे सहित विहाराच्या अध्यक्षा शीला मेश्राम आणि मोठ्या संख्येने सैनिक उपस्थित होते. आभार प्रदर्शन बालसैनिक इवांश शेंडे यांनी केले. समापन गाथेने कार्यक्रमाचे सांगता झाली.



