Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

आत्मपरीक्षण करून माणुसकी जपण्याची गरज; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 3 3 2 3 3

आत्मपरीक्षण करून माणुसकी जपण्याची गरज; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

‘आम्ही वरवरचे’ हा विषय वाचताक्षणीच मला एक घटना आठवली. मी आकाशवाणीत नोकरी करत असताना प्रथितयश लेखक, कादंबरीकार ‘शिवाजीराव सावंत’ यांना भेटण्याचा योग आला. मी त्यांच्याकडे सही व संदेश मागितला. त्यांनी दिलेला संदेश, ‘माणूस कसा दिसतो यापेक्षा तो कसा असतो. याला जीवनात फार फार महत्व आहे.’ आजही ते वाक्य माझ्या काळजावर कोरलं गेलं आहे. सध्याच्या परीस्थिती नुसार या वाक्याचा गाभीर्यानं विचार केला पाहिजे. सध्याच्या काळात माणसे एकमेकांशी अंतर राखून वागताना दिसतात.

आपसातील संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी त्यामागं खरी आपलेपणाची भावना नसते. सारं वागणं “आम्ही वरवरचे” असं असतं. माणसं गोड बोलतात, संवाद प्रभावी असतो, पण त्यामागं दांभिकता असते. एखाद्याला “काळजी घे” सांगणारे स्वतः मात्र कधीच त्याच्या अडचणीत धावून जात नाहीत. हेच वरवरचं वागणं होय. यामध्ये भावनेचा ओलावा नसतो, मनापासून केलेली मैत्री, प्रेम, नातं याचा फक्त देखावा उरतो. आभासी दुनियेत रमणारी माणसे वागताना कृत्रिमतेचा आधार घेतात. त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. सायबर गुन्हेगारीमध्ये याचा मोठा वाटा आहे. सोशल मिडीयावर खोटे प्रोफाइल तयार करून वरवरच्या संवादातून फसवणूक केली जाते. लग्नाच्या जाहिरातींमध्ये खोटा पगार, बनावट फोटो टाकून विश्वास संपादन केला जातो. खोट्या आमिषाला बळी पडून आर्थिक, मानसिक, भावनिक, नुकसान होते.

पूर्वीच्या काळात नाती अतूट बंधनात बांधलेली होती. विश्वासार्ह आणि वेळप्रसंगी त्याग करणारे मित्र, नातेवाईक असत. आज मात्र अनेक नाती केवळ स्टेटस किंवा समाजात आपली प्रतिमा जपण्यासाठी टिकवली जातात.नाती दृढ करण्यासाठी संवादाचे पूल उभारण्याची गरज आहे. आभासातून वास्तवात येण्याची गरज आहे. “आम्ही वरवरचे” ही स्थिती राजकीय क्षेत्रात सुध्दा आहे. गोड बोलून मतं मिळवायची मग मतदारांना विसरायचं. जनतेसमोर जोडणारे हात घोटाळ्यांत बरबटलेले असतात. नेते वेगवेगळे मुखवटे घालतात. पण सत्तेत गेल्यावर शब्द विसरतात. कित्येकदा आपणही नकळत ती भूमिका घेतो. खरेपणा, संवेदनशीलता, आणि जबाबदारी ही मूल्यं बाजूला पडत चालली आहेत.आपण पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण वरवरचे न राहता खरी माणुसकी जपली तरच नात्यांना अर्थ येईल. आज ‘सोमवारीय काव्य त्रिवेणी’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘आम्ही वरवरचे’ हा विषय चिंतनशील आहे. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

4.3/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 3 2 3 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
19:47