0
4
8
2
9
7
संबोधन
शुद्ध विचार असावेत
सभेत संबोधन करताना,
पटवून देणारी भाषा
गोड असावी बोलताना।
थोपवू नयेत विचार आपले
उगीच जबरदस्ती कुणावर,
कोरले जावेत शब्द काही
ऐकणाऱ्याच्या हृदयावर।
नको शेरोशायरी उगीच
ऐकताना कंटाळवाणी वाटावी,
मोजक्या शब्दांत मांडणी
अभ्यासपूर्ण भाषा असावी।
संबोधन असावं असं
समाजासाठी उपयोगाचं,
इतिहासातील दाखले देता
भान असावं शब्दांचं।
राखावा सन्मान सर्वांचा,
टोचून बोलू नये कुणालाही,
टाळावी शिव्याशापांची भाषा,
वाणी-आचरण शुद्ध ठेवावी।
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
9
7



