Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

हिंदी महानाट्य “जय महाकाल” चे आयोजन मंगळवारी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 4 1 0 0

हिंदी महानाट्य “जय महाकाल” चे आयोजन मंगळवारी

जय महाकाल या महानाट्यात, चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य च्या भूमिकेत आयुष तिवारी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर: (दि १८) शहरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेशभट सभागृहात, मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी, सायंकाळी 7 वाजता. निराली एंटरटेनमेंट आणि गौरीशंकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गुरुगोरखनाथ मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी भव्य महानाट्य”जय महाकाल” चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. कांचनताई नितीनजी गडकरी, महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हत्तीबेड, अभिनेत्री प्रियंका ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे आचार्य नवीन महाराज यांची उपस्थिती राहील. याप्रसंगी विशेष उपस्थितीत आमदार मोहन मते, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, अनिल सोले, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार टेकचंद सावरकर यांची उपस्थिती राहणार आहे.

महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक हर्षकुमार यादव आणि नागपुरातील निर्माता दर्शननाथ शंकरराव जाधव यांचे असून हा कार्यक्रम निःशुल्क आहे. तरी हिंदी महानाट्य, जय महाकाल पहाण्यासाठी विसरु नका, कारण या महानाट्यात चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य आणि राजा भर्तहरिनाथ की महागाथा दाखवणार आहे. या सर्वांनी जय महाकाल, हिंदी महानाट्याचे आयोजन केलेले आहेत. तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त मोठ्या संख्येने घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे