घोरपडी व्हिलेज प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
अमृता खाकुर्डीकर, पुणे
घोरपडी व्हिलेज प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे.दि.24 (प्रतिनिधी) भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे गोळीबार मैदान,घोरपडी येथील व्हिलेज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे गुरुपौर्णिमा उत्सव समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द लेखक व व्याख्याते प्राचार्य श्याम भुर्के उपस्थित होते. यावेळी ढोल लेझीमच्या तालात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ देऊन भुर्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भुर्के यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. व्हिलेज हायस्कूलच्या प्राचार्या दीपाली चाचड व्यासपीठावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विद्यार्थी वर्ग प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन शाळेतील सर्व शिक्षकांचा गुरू पौर्णिमेनिमित्त सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.खरात सर यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक विलास गरुड यांनी, तर आभार शिक्षिका सौ.बारवकर यांनी मानले.





