Breaking
ई-पेपरनवी दिल्लीपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

महायुतीतील वाद उघड; भाजपाच्या मदन भोसलेंवर अजित दादांच्या आमदारांची टीका

अजित दादाच्या खासदाराने तर हातच जोडले

0 1 8 2 9 9

महायुतीतील वाद उघड; भाजपाच्या मदन भोसलेंवर अजित दादांच्या आमदारांची टीका

अजित दादाच्या खासदारानें तर हातच जोडले

सातारा जिल्हा प्रतिनिधी

कराड: माझी विचारधारा, माझा पक्ष आणि चिन्ह ठरलेलं आहे. तेव्हा कोण कुठे जातयं याचा मी विचार करत नाही. माझा मतदारसंघ मी विकासात्मक बांधलेला आहे. मूळात मदन भोसले हे माझे राजकीय विरोधकच आहेत.

त्यामुळे ते कुठल्या पक्षात गेले अन् कुणाला भेटल्याने मला काहीच फरक पडत नसल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी म्हटले आहे. कराड येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील यांनी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मदन भोसले यांच्या भेटीवर भाष्य केले. आ. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत वाई विधानसभा मतदार संघात वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याच्या विकासचं व्हिजन काय…?

अजित दादाच्या खासदारानें हातच जोडले

नवनिर्वाचित खासदार नितीन काका पाटील आज पहिल्यांदाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आले होते. तेव्हा माध्यम प्रतिनिधींनी सातारा जिल्ह्याच्या विकासचं व्हिजन काय असा सवाल विचारताच, केवळ हात जोडले अन् आता चला म्हणाले. त्याच्या या उत्तराने खासदारकी मिळाली परंतु, जिल्ह्यासाठी काय करायचे यांचा विचार किंवा व्हिजनच नसल्याचे दिसून आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 2 9 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे