‘स्वच्छता अभियान सत्कारापुरते नव्हे, सत्कार्य म्हणून करावे’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘स्वच्छता अभियान सत्कारापुरते नव्हे, सत्कार्य म्हणून करावे’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला…” सुप्रसिद्ध राष्ट्रसंत, कर्मयोगी, स्वच्छताप्रेमी, प्रबोधनकार गाडगे महाराज यांचे हे भजन आज आठवले. फाटके असले तरी स्वच्छ कपडे, फुटके असले तरी निर्मळ खापर आणि झाडू हातात घेऊन स्वच्छ व तितक्याच निर्मळ मनाने ग्रामस्वच्छता करत करत वैचारिक परिवर्तन करून अंधश्रद्धेचा कचरा दूर सारत राष्ट्रसंत या पदापर्यंत पोहचलेले गाडगेबाबा म्हणूनच स्वच्छता अभियानाचे खरे आदर्श प्रेरणास्त्रोत ठरतात.
स्वच्छता मग ती घराची असो, गल्ली गावाची असो, शाळेची असो किंवा मन मेंदूची असो. ती वेळच्या वेळी झाली तरच तिथे प्रसन्नता, सुख समृद्धी नांदते. परंतु स्वच्छता ही वैयक्तिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी असल्याचे प्रत्येक व्यक्ती जेव्हा मान्य करेल आणि संत गाडगेबाबांच्या कर्मयोगाचा स्वीकार करेल, तेव्हाच खर्या अर्थाने ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी होतील. कारण कोणतेही काम सत्कारासाठी करणे वेगळे आणि सत्कार्यासाठी करणे वेगळे असते. सत्कारात दिखाऊपणा असतो तर सत्कार्यात समर्पण वृत्ती असते.
बाल संस्कार
स्वच्छता अभियान
राष्ट्र सन्मान
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरीता आदरणीय राहुलदादांनी दिलेले चित्र म्हणूनच या संदर्भात खूप बोलके आहे. शाळकरी मुलांचा एक गट हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात समर्पित झालेला दिसतो आहे. हीच समर्पणवृत्ती, स्वच्छतेचे महत्त्व, श्रमप्रतिष्ठेचा संस्कार बिंबवण्याचे काम शाळा मनापासून करत असतात आणि तशी सवयच लागून जाते. अशा सवयींचीच स्पर्धा असेल तर मग काय! स्वच्छता कोणतीही असो ती स्वयंप्रेरणेने सिद्धीस जाण्यास कोणतीच अडचण येणार नाही. कालचे चित्र येताक्षणीच हायकू रचनांची बरसात चालू झाली. तुलनेत कालचा विषय थोडा सोपा असल्याने खूप कलात्मक, आकर्षक हायकू निर्मिती अनुभवता आली.. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहूल दादा आणि समूह प्रशासनाचे आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



