“गीता फॉर युथ” तर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
पत्रकार बांधवांना कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी निमंत्रण
“गीता फॉर युथ” तर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
पत्रकार बांधवांना कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी निमंत्रण
जिल्हा प्रतिनिधी, नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूरः (दि ४) माध्यम प्रतिनिधी व पत्रकार बांधवांना “गीता फॉर यूथ” या विशेष युवक-केंद्रित कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी सादर निमंत्रित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला असून, भगवद् गीतेतील शाश्वत विचार आजच्या युवकांच्या जीवनाशी आधुनिक व व्यावहारिक पद्धतीने जोडण्याचा त्याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम चिटनवीस सेंटर नागपूर येथे बुधवारपासून ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी 6 ते 8:30 यावेळेत आयोजित करण्यात आले आहेत.
करिअरचा ताण, तणाव, निर्णय क्षमता, नातेसंबंध आणि मानसिक संतुलन यांसारख्या युवकांच्या आजच्या समस्या गीतेच्या दृष्टिकोनातून मांडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे नेतृत्व व मार्गदर्शन सुखविंदर बिंद्रा (सुखी भैय्या) करणार आहेत. ते चार्टर्ड अकाउंटंट, लाईफ कोच व युवक मार्गदर्शक, तसेच द आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. त्यांनी 60 हून अधिक देशांमध्ये युवकांसोबत कार्य केले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मा.आमदार डॉ. आशीषराव आर. देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असून, विविध शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक व युवक प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. द आर्ट ऑफ लिव्हिंग ही गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांनी स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था असून, ती 180 पेक्षा अधिक देशांमध्ये मानसिक आरोग्य, तणावमुक्त जीवन, युवक नेतृत्व, शिक्षण, शांतता व सामाजिक विकासासाठी कार्यरत आहे.



