Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रविदर्भ

“राष्ट्रीय विज्ञान दिवस व जागतिक मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

द्रोणागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रमाचे आयोजन

0 5 1 7 8 7

“राष्ट्रीय विज्ञान दिवस व जागतिक मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

द्रोणागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रमाचे आयोजन

बातमीदार प्रतिनीधी उरण

बिनधास्त न्यूज नेटवर्क

उरण : (दि. २७ फेब्रु) द्रोणागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या युगात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य श्री. मा. वे. पिल्ले यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आर. आर. गायकवाड (आयएमसी चेअरमन व GM PP&D, JNPT) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महान भारतीय शास्त्रज्ञ भारतरत्न सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री. आकाश सुनील पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्यांना विज्ञानाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक विचारांची आवश्यकता. प्रशिक्षणार्थ्यांनी केवळ कौशल्य न शिकता स्वतःमध्ये संशोधक वृत्ती विकसित करणे गरजेचे आहे.

रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि विज्ञानातील नवीन प्रवाह (Recent Trends) यावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे श्री. आर. आर. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “गणिताचे मानवी आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानाची कास धरल्यास व्यावसायिक क्षेत्रात यशाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.”

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. मा. वे. पिल्ले यांनी स्पष्ट केले की, आयटीआयमधील प्रत्येक ट्रेड हा थेट विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडलेला आहे. तंत्रज्ञानाची प्रगती ही विज्ञानाच्या पायावरच उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागीय स्तरीय तंत्र प्रदर्शन मध्ये क्रमांक पटकावल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार समारंभही पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम. पी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेतील निदेशक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचा सन्मान राखण्याची प्रतिज्ञाही यावेळी करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे