
0
5
4
7
7
9
शून्य प्रहर
आयुष्याच्या या वळणावर
लाभला एक शून्य प्रहर
ध्येयवादी मग जीवनाचा
घेतला धांडोळा क्षणभर ||१||
त्या शून्य प्रहराच्या समयी
सारी जमापुंजी पाहिली
स्वानंदाच्या उंबरठ्यावर तेव्हा
जीवन नौका उभी राहिली ||२||
मिळविला निखळ आत्मानंद
सुखी जाहला हा प्रवास
नाही बागळली लालसा कधी
नव्हताच कधी अति हव्यास ||३||
शून्य त्या प्रहराच्या क्षणी
मंत्रमुग्ध असा झालो
कर्तृत्ववान ही कारकीर्द
याची डोळा अनुभवलो ||४||
शून्य प्रहर असा घेऊन गेला
भूतकाळाच्या वाटेवर
झालो स्वार तत्क्षणीच
परमानंदाच्या लाटेवर ||५||
पांडुरंग एकनाथ घोलप
ता. जुन्नर, जि.पुणे
0
5
4
7
7
9



