0
4
8
2
9
3
आला श्रावण
आला आला श्रावण मास
सणवारांचा माह खास
पहिला दिवस असे सोमवार
भक्त भेट देती शिवालयास!!!
पहिली मंगळागौर करण्या
लेक येतसे घरा
दाटून येती आठवणी
येता माहेरा!!!
लागे मेहंदी हातांना
लगोलग सण नागपंचमी येई
झोका पिंगा फुगडी खेळता
आनंदाला उधाण येई!!!
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
सण दोन्हीही एकत्र येती
गोड नारळीभात होई घरोघरी
बंधुराजांचा वाढे खर्च भारी!!!
जन्माष्टमीचा थाट निराळा
बाळकृष्ण पाळण्यात सजे
गुणगाणं बाळराजांचे
गाता गाता रात्र सरे!!!
बी. आर. पतंगे (beeke )
जि.अहिल्यानगर
0
4
8
2
9
3



