0
4
8
2
9
4
गुंफण प्रेमाची
रोजच भेटतेस ग मला
किती तरी हा रोज वेगळेपणा
गुंतत चाललो मी मी तुझ्यात
नित्य तुझा हा नवखेपणा…..
नित नवी नवी भासे मला
मनाच्या कोपर्यात छान डुले
तुझ्या वाटेवर मग मी ग
गुलाबांच्या पायघड्या घाले…..
सांजसमयी आवरून यायची
सूर्यास्तास माझ्या भेटीला
प्रेमाचा झरा वाहायचा तुझा
अखंड स्मरतेय आजही मला…
अबोल नयन तुझे हे
कातर वेळेत व्हायचे बोलके
चेहर्यावरील लाली तुझ्या
चुंबावी वाटे मज हलके….
गुंफण प्रेमाची आपली ती
नित नवी नवी भासे मला
कवेत घे ग सजणी आता
धीर धरवतोय का ग तुला…
वसुधा नाईक, पुणे
========
0
4
8
2
9
4



