प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन
दारव्हा: न.प.मराठी शाळा क्र.४ दारव्हा येथे शिक्षण विभाग पंचायत समिती दारव्हा प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत फोर्टिफाईड तांदूळ व तृणधान्यावर आधारित तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दारव्हा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती खेडकर यांनी भूषवले कार्यक्रमाचे उदघाटक् म्हणून श्री.सागर भंडारी CDPO दारव्हा हे उपस्थित होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती नम्रता राजस विषयतज्ञ् गृह विज्ञानशास्त्र कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे ह्या उपस्थित होत्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शा.पो.आ.अधीक्षक श्रीमती वंदना नाईक , न.प प्रशासन अधिकारी श्री रमेश राठोड तसचे विस्तार अधिकारी ICDS तुषार महाजन,संरक्षण अधिकारी श्री पवार सर , सर्व केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक श्री नरवाडे सर,श्री चिरडे सर, श्री गुल्हाने सर हे उपस्थिती होते.
शा.पो.आ.अधीक्षक वंदना नाईक यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये फोर्टीफाईड तांदूळ व तृणधान्यावर आधारित पाककृती स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश वर्णन केला. उपस्थित मान्यवरांनी आहारातील तृणधान्याचे महत्व यविषयी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती खेडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व पोषण ही जबाबदारी शिक्षण विभाग समर्थपणे सांभाळत असल्याचे सांगितले.
पाककृती स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती सोनल दांडगे जिजामाता कन्या विद्यालय नेर,रश्मी बोभाटे दी इंग्लिश हायस्कुल नेर, प्राध्यापक निकिता पुनसे व रजनी माणिकपुरे नेहरू महाविद्यालय नेर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांसाठी इडली सांबार व ज्वारीच्या पिठाचे लाडू अशा पौष्टिक अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे तृणधान्यापासून काढलेली सुंदर रांगोळी, पोषण आहार योजनेअंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांच्या फोटोंनी सजलेला सेल्फी पॉइंट, नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक एक यांनी सर्व स्पर्धकांसाठी बनविलेली मास्टर शेफ कॅप ह्या बाबी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण ४० शाळांनी सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण पाककृती सादर केल्या. स्पर्धेमध्ये
प्रथम क्र.- जि. प. शाळा टाकळी बु.,द्वितीय क्र- जि. प. शाळा मोझर (इ), तृतीय क्र.- स्वा.सावरकर विद्यालय भुलाई तसेच प्रोत्साहानपर न.प.मराठी शाळा क्र २ दारव्हा व मनोहर नाईक उर्दू शाळा यांनी पटकवला .प्रथम द्वितीय व तृतीया क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धकांना अनुक्रमे 5000,3000,2000 रुपये पारितोषिकाची राशी संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहे. स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पोषण आहारासाठी अतिशय अल्प मानधनात कार्य करणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस ताई यांचा साडी ,चोळी व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच तालुकास्तरीय उत्कृष्ट परसबाग स्पर्धेमध्ये निवड झालेल्या 1)घेरवरा हायस्कुल दारव्हा,2) जी. प. शाळा महातोली 3)जि . प. शाळा घाटकिन्ही तांडा 4) जि.प. शाळा ब्रम्ही 5) जि.प शाळा गणेशपूर तांडा 6) न.प. उर्दू शाळा क्र १ या सहा शाळांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.सदर कार्यक्रमास जि. प, न.प. व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी ,पालक तसेच बीआरसी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी न.प.म. शाळा क्र 4 चे मुख्याध्यापक श्री गुल्हाने सर व सर्व शिक्षकवृंद तसेच शा.पो.आ.डाटा एंटरी ऑपरेटर सतीश ताजने यांनी अथक पारिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबळे सरांनी केले दुद्दलवार मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.



