Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

नागपुरातील तुंबलेले रस्ते, अडकलेली वाहने आणि गुदमरलेला श्वास

सविता धमगाये, नागपूर

0 4 8 2 9 0

नागपुरातील तुंबलेले रस्ते, अडकलेली वाहने आणि गुदमरलेला श्वास

कालचा दिवस तसा कायम आठवणीत राहील असाच होता. भयंकर मनस्ताप घेऊन सायंकाळ उगवली. झाले असे,की सकाळी मी काही कामानिमित्त बाहेर पडले. साधारण अकराच्या दरम्यान निघाली. आधी कावरापेठ इथून निघून पुढे चारचाकीने रिंगरोडने परत येऊन सावनेर, धापेवाडा, मोहपा करीत हिंगणा येथे गेली. रस्त्याने हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत परत येतांना मुसळधार पावसाने साधारणत: सातचे दरम्यान आमचे स्वागत केले. पाऊस इतका मुसळधार होता की, ड्रायव्हरला पुढचे काहीच दिसेना. अगदी पाचच मिनिटात सगळे रस्ते भरून नदीच्या रूपात वाहू लागले. हिंगणा मार्गावर ठिकठिकाणी बांधकाम सुरू असल्याने आणि त्यात पावसाने भर घातल्याने वाहतूक बरीच मंदावली. वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला टाळण्यासाठी आम्ही समृद्धी महामार्गावर गाडी टाकली. तिथून पावसाचा मारा चुकवत कसेतरी वर्धा रोडवर पोहोचले.

उज्वलनगरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रोने आटोमॅटीव चौकात पोहोचले. एव्हाना पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. मी आपली स्कूटी काढली पहिल्यांदा विचार केला नागपूरला थांबावे. पण मारोती शोरूमपासून पूर्ण चौकात पाणीच पाणी. मग आपलेच गाव गाठायचे ठरवले. मेट्रो पूल संपला आणि खरी परीक्षा सुरू झाली. लायसन्स मिळवण्यासाठी सुद्धा एवढी मेहनत केली नसेल, इतके कसब त्यादिवशी पणाला लागले. फुटभर पाण्यातून हळूहळू सरकारी वाहने. वाहनांची भयंकर गर्दी. सिटी बस, ट्रक, चारचाकी, दुचाकी, रिक्षा, लाॅरी यांची गर्दीच गर्दी. आधीच बांधकाम सुरू असल्याने रस्ते अरुंद झालेले. कामठीकडे जाणारा तो एकमेव रस्ता. सगळे दिवसभराची कामे आटोपून घरी निघालेले. वाहनांनी अगदी इंच न इंच जागा व्यापलेली. त्यातही नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून पाणी भरले असल्याने वाहनचालकांनी जीव धोक्यात घालण्यापेक्षा उजव्या बाजूने वाहन टाकणे पसंत केले.

शहरात वाहतुकीची पूर्णतः कोंडी झाली आहे. रस्ते अगदी दाटून गेलेले. कुठलेही वाहतुक नियंत्रण नाही, काही नाही. समोर असणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे श्वास गुदमरायला लागला. इच्छा नसतानाही कार्बन मोनोआक्साइड श्वासात भरून घ्यावा लागत होता. चिखल रस्त्यावर असल्याने घसरण निर्माण झाली. पाच सात मिनीटांची प्रवास तब्बल दीड तासाचा झाला. श्वासात गेलेल्या ‘कार्बन मोनोआक्साइड’ चे परिणाम भोगत आहे मी आता.

दहा वर्षांपूर्वी सुद्धा जोरदार पाऊस पडायचा. पण त्यावेळी फक्त आटोमॅटीव चौक, झाशी राणी चौक, नरेन्द्र नगर पुल एवढ्याच ठिकाणी पाणी तुंबल्याचे पहात होती, ऐकत होती. पण आता पाऊस झाला की अख्ख शहर पाण्यात जाते. गल्लीबोळ सुद्धा तळी बनतात. एकीकडे रस्ते उंच आणि पावसाचे पाणी निस्तारण्याची व्यवस्था अगदीच ढिसाळ. त्यापेक्षा बौद्ध कालीन, अशोककालीन, रस्ते आणि सांडपाणी विसर्जन व्यवस्थेचा अभ्यास आजच्या तथाकथित अभियंत्यांनी करावा. आणि समजून घ्यावा सत्ताधाऱ्यांनी.

सविता धमगाये, नागपूर
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे