बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: शुक्रवार दि. २६ डिसेंबर ते सोमवार दि. २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये इ. ५ वी ते इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये दि.२६ व २७ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तसेच दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी फनी गेम्स व आनंदी मेळावा संपन्न झाला. शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सर्व प्रथम विविध गुणदर्शन कार्यक्रमांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून नटराजाच्या तसेच स्वर्गीय प्रभाकरजी राणे व स्वर्गीय अर्चनाजी राणे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचीत स्वागत करण्यात आले आणि नंतर श्रीफळ वाढवून, रंगमंचाचे पूजन करून विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी, कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे, परीक्षक देवदत्त जोगळेकर सर, परीक्षक सुनिल माळवी सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्नेहसंमेलन अध्यक्ष अजित नाईक सर, स्नेहसंमेलन उपाध्यक्ष धनराज फड सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, बालवाडी प्रमुखा प्रमोदिनी पाठक मॕडम, प्राथमिक विभागाच्या स्नेहसंमेलन अध्यक्षा तथा शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम, स्नेहसंमेलन उपाध्यक्षा समता नाईक मॕडम, सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले.
दोन दिवस चाललेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन अभंग, भक्तीगीत, पोवाडा, कोळीगीत, देशभक्ती गीत यांसारखी विविध प्रकारची बोलगीते, नाट्यछटा, नाटिका व आपल्या संस्कृतीची जोपासना व्हावी यासाठी विविध प्रकारची समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, सादर केली आणि आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे अतिशय सुंदर पध्दतीने प्रदर्शन केले. या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांसाठी सुनिल माळवी सर, देवदत्त जोगळेकर सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सोमवार दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स व आनंदी मेळावा आयोजित करण्यात आला होता.विविध प्रकारच्या फनी गेम्स मध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच आनंदी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्टॉल्सची आकर्षक पध्दतीने मांडणी केली होती व तेथे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. या आनंदमेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होवून खरेदी विक्रीचा आनंद घेतला.
स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकारिणी सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, स्नेहसंमेलन अध्यक्ष अजित नाईक सर, स्नेहसंमेलन उपाध्यक्ष धनराज फड सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक, ग्रामस्थ, रसिक प्रेक्षक व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.



