Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्ली

जनरल अरुणकुमार वैद्य यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

जनरल अरुणकुमार वैद्य यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

मान्यतेसाठी प्रकरण मंत्रालयात

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग (दि.१० ) भारताचे माजी लष्कर प्रमुख व अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांची ३९ वी पुण्यतिथी अ. ता. शि. प्र. मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक शाळेत साजरी करण्यात आली. जनरल वैद्य यांच्या तसबिरीस कॕप्टन उमेश दत्तात्रेय वाणी यांच्याहस्ते पुष्पमाला चढविण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर होते.

“शहिद” वैद्य यांच्या आत्म्यास चिरशांती लाभण्यासाठी लष्करी रिवाजानुसार दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली. “महावीरचक्र पुरस्कार विजेते” अरुणकुमार वैद्य यांच्या “आॕपरेशन ब्ल्यूस्टार” संबंधी माहिती सभाध्यक्ष बळवंत वालेकर , कॕप्टन उमेश वाणी , माजी जिल्हा सरकारी वकील अॕड. प्रसाद पाटील , सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश मगर , माजी नगरसेवक सुकुमार भगत , सैनिक हवालदार (नि, ) संतोष तावडे , सैनिक हवालदार राजेंद्र म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितली . तसेच जनरल वैद्य यांचा स्म्रुतिदिन शासकीय इतमामाने साजरा होण्यासाठी प्रकरण जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंत्रालयात पाठविले गेल्ले असून ते विचाराधीन असल्याचे पत्रकार बळवंत वालेकर यांनी सांगितले .

प शिघ्रकवी राजाराम भगत यांनी स्वरचित “शहिद वैद्य” ही कविता गाऊन वातावरण निर्मिती केली ,
या कार्यक्रमानिमित्त माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व रघुजीराजे आंग्रे यांच्या कडून आलेल्या शुभ संदेशांचे वाचन करण्यात आले. शेवटी विलास पनासे यांनी आभार मानले.

सदर कार्यक्रमास आ. ता. शि. प्र. मं. चे सेक्रेटरी द. ल. माळवी , संचालक सुकुमार भगत , माजी नगरसेविका व्रुषाली ठोसर , अॕड. अजय उपाध्ये , अॕड. प्रमोद पाटील., यशोधन पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर वागळे , सौ. शलाका वागळे , जनसेवा पतसंस्थेचे उपाध्यक्ष मुश्ताक घट्टे , , कॕप्टन उमेश वाणी , वंदेमातरम् पतसंस्था पेणचे अध्यक्ष नरेन जाधव , R, C, F, चे निव्रुत्त अधिकारी दैवदत्त जोगळेकर , डाॕ. चंद्रकांत वाजे , माजी सैनिक सर्वश्री राजेँद्र म्हात्रे , महैश क्रुष्णा शेरमकर , संतोष तावडे, गौतम दसराज , तसेच दिलीपकुमार देवळेकर , शीघ्रकवि विनोद टेंबुलकर व राजाराम भगत , माजी मुख्याध्यापक सूर्यकांत म्हात्रे , दादा क्लासेसचे राकेश वारिसे , जितेंद्र पाटील , आर्यन वालेकर , संस्थेचे मुख्याध्यापक विजय नांदगावकर (भोवाळे ), सौ. कल्याणी वेखँडे (शिशुविहार) , सिताराम जाधव (जांभूळपाडा ) , काळे (भाल), सौ. प्रतिभा पाटील (लोणारे) श्रीमती रुपा कोळी , मंगेश आपणकर इ, उपस्थित होते . राष्ट्रगीतानंतर सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे