Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

स्व.श्रीनिवास बाळाराम भगत यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनी सुश्राव्य संगीत भजन मैफिलीचे आयोजन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

स्व.श्रीनिवास बाळाराम भगत यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनी सुश्राव्य संगीत भजन मैफिलीचे आयोजन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: दि. १ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी आवास येथील सामाजिक कार्यकर्ते व संगीत भजन प्रेमी श्रीनिवास बाळाराम भगत यांचे दुःखद निधन झाले. मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी आवास [ भगत आळी ] येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा चतुर्थ पुण्यस्मरण दिन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांचे पुत्र हितेश श्रीनिवास भगत व विराज श्रीनिवास भगत यांनी सुश्राव्य संगीत भजन मैफिलीचे आयोजन केले होते.

सर्वप्रथम स्वर्गीय श्रीनिवास बाळाराम भगत यांच्या प्रतिमेचे त्यांच्या पत्नी श्रध्दा श्रीनिवास भगत, पुत्र हितेश श्रीनिवास भगत, विराज श्रीनिवास भगत, स्नुषा राजश्री हितेश भगत, मानसी विराज भगत व उपस्थितांनी पूजन केले. त्यानंतर संगीत भजन मैफिलीस प्रारंभ करण्यात आला. हितेश भगत व विराज भगत यांनी मैफिलीतील सर्व कलाकारांचे व उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत केले.
या संगीत भजन मैफिली मध्ये मी मराठी वाहिनीवरील आवाज महाराष्ट्राचा स्पर्धेचे विजेते महेशबुवा कंठे, बदलापूर व इ.टीव्ही मराठी वाहिनीवरील गौरव महाराष्ट्राचा स्पर्धेचे विजेते राहुलबुवा खरे, छत्रपती संभाजी नगर या दोन गायकांचे सुमधुर गायन झाले. पखवाज साथ रायगड भूषण मधुकर बुवा धोंगडे, पनवेल यांनी केली तर तबला साथ रायगड भूषण सुरज गोंधळी, पनवेल यांनी केली. हार्मोनियमची साथ उल्हास पागर यांनी केली. या संगीत भजन मैफिलीत धनंजय सुरेश भगत, आवास यांनी अतिशय सुंदर असे निवेदन केले. सर्व कलाकारांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत – आवास माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अभिजीत राणे, रायगड जिल्हा व अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील [ कुरुळ ], संगीतप्रेमी जगदीश पाटील [ वायशेत ], प्रमोद पाटील [ वायशेत ], गजानन पाटील [ मांडवा ], आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे सभासद दिपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवासचे माजी प्राचार्य प्रमोद भगत, माजी वरिष्ठ लिपीक श्री. प्रकाश राणे तसेच इतर मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे