0
4
8
2
9
7
एकटी भारी
तिची त-हाच कसली न्यारी
लाखात एकटी भारी..
स्वप्नात चोरूनी आली
अन् मिठी अशी जरतारी
लाखात एकटी भारी..
तो चंद्र नभीचा हसला
अन् हळूच जमली यारी
लाखात एकटी भारी..
मातीत थेंब रूजताना..
गंधित धरित्री सारी
लाखात एकटी भारी..
गावात आग लागली
अन् फितूर जाहल्या सरी
लाखात एकटी भारी..
हा वसंत बहरत आला
जुनी पानं गळली सारी
लाखात एकटी भारी..
तिची त-हाच कसली न्यारी
लाखात एकटी भारी..
सविता पाटील ठाकरे,
सिलवासा
0
4
8
2
9
7



