Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबईसाहित्यगंध

पायघड्या

सुरेखा रा.चित्ते श्रीवर्धन जि. रायगड

0 4 8 2 9 0

पायघड्या

लेक माझी आहे सासरी
उद्या येणार माहेरी
सासू जाच करी,नणंद असे फुगरी
रडत जाते जाताना लेक सासरी
तिची वाट पाहत बसले वसरी
तिला आवडतात म्हणूनच केल्यात मी अलुवड्या
घालून बसले तिच्यासाठी पायघड्या
सासरा प्रेमळ आहे मनी ठेवुनी जान
त्याच्या कडूनच मिळे लेकीचा मान
नवरा करी खीसखिस येई डोळ्याला पाणी
लेक फिरते शेतात पाय अनवाणी
भावकी तिची उगा खार तिच्यावर खाई
कशी नांदते लेक कुणास ठाव बाई
नदी जाते टोपले भरून धुणं धुयाला
शिळी भकरच रहाते तिच्या नशिबाला
गुराढोरावर तिची माया अमाप
उपाशी पोटी राहुनी ती कढतेया ताप
नेसलं लुगडं त्याला किती ते ठिगळं
आला कुकवांच्या तिच्या भाळी वगळं
कशी नांदते लेक कुणा सांगेना वनवास
कधी संपल देवा तिचा तरास
एक सण हा पंचमीचा
आहे माहेरवाशिणीचां
पुरणपोळीचा घास भरविन माझ्या लेकी
मावळला दिस उशीर झाला लवकर ये की
फुलांच्या पायघड्या घातल्या तुझ्या मायनं गं बाई
एव्हढा विचार करुनी जीव रडकुंडीला येई

सुरेखा रा.चित्ते
श्रीवर्धन जि. रायगड
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे