
0
4
0
9
0
3
साखरपेरणी
सखे तुझ्या शब्दाशब्दास मी जाणतो
शब्दभाव तुझा ह्रुदयात जपून ठेवतो
तुझे ते बोलणे जागवतेय माझे कर्तव्य
तुझ्या बोलण्याने वाढते आहे मनोधैर्य
रसाळ वाणीतून तुझ्या नेहमीच बोलते
साखरपेरणी शब्दातून ओसंडून वाहते
जगण्यातला अर्थ बहराला आला आहे
सहवास तुझा गोडवा वाढत जात आहे
तिळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणतेस
तिळगुळाचा गोडवा वाढवीत राहतेस
अर्थ आला तुझ्यामुळे मला जगण्याला
तुझ्यामुळेच जीवनप्रवास ही सुखावला
येऊ दे संकटे वादळे पार करील त्याला
बळ येते मज हत्तीचे सामना लढायला
सदोदित प्रेरणादायी तुझी साखरपेरणी
पडली आहे मला नित्याची अंगवळणी
बी एस गायकवाड
पालम,जि.परभणी
0
4
0
9
0
3





