Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरनागपूरसंपादकीयसाहित्यगंध

एक नातं बंधनापलीकडलं

प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर

0 4 0 9 0 1

एक नातं बंधनापलीकडलं

आयुष्याच्या वळणावर तो तिला भेटला नि तिचे आयुष्यच बदलले..म्हणतात ना,एवढ्या मोठ्या जगात इतके लोक असतांना त्याच व्यक्तीशी भेट व्हावी खरच पूर्वीच्या जन्माच काहीतरी नातं असाव म्हणूनच तर तो तिच्या जीवनात खूप सारा आनंद घेऊन आला..!! एका कार्यक्रमात राकेश व प्रतिक्षा यांची भेट झाली. जुनी ओळख असल्यागत पहिल्याच भेटीत खूप गप्पा रंगल्या आणि नंतर फोनवर त्यांच्यात रोज संवाद सुरू झाला..हळूहळू एकमेकात ते गुंतत गेले. त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या..घरच्यांशी खोटे बोलून दोघेही बाहेर भेटत होते. त्यांना एकमेकांची जणू सवयच झाली होती. एक दिवस प्रतिक्षा बोलली नाही तर तो तिच्यासाठी वेडा व्हायचा.तिला पण राहावत नव्हते.

राकेश तिची खूप काळजी घेऊ लागला.. प्रतिक्षाच्या खडतर जीवनात त्याचा प्रवेश ती पुरती सुखावून गेली, राकेशकडे ओढली जाऊ लागली.. काय होतय तिलाच कळेना राकेश पेक्षा प्रतिक्षा वयाने मोठी होती तरी राकेशला ती खूप आवडायची. आणि राकेश तिला आवडायचा त्याला ती जीवाभावाचा मित्र समजू लागली..तोही तिच्यावर जीव ओवाळून टाकायचा.. एक दिवस राकेश तिला प्रपोज करायच अस ठरवलं आणि व्हेलंटाईन डे ला त्यांनी तिला गुलाब देऊन प्रपोज केल. काय उत्तर दयावे तिला कळत नव्हते तिच्या नजरेत त्याला प्रेम दिसत होत तिने कुठलाही विचार न करता त्याला होकार दिला.मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं..समाज बंधनाला जुगारून त्यांनी प्रेम केले खरे, पण ते दोघे वास्तवात एकत्र कधीच येऊ शकत नव्हती.

कारण राकेश आणि प्रतिक्षा विवाहित होती. चाळीसीच्या उंबरठ्यावर त्यांची भेट घडली होती..पण प्रेम आंधळ असत ना? राकेश म्हणजे तिच्यासाठी जीव की प्राण दु:खात सुख,रडण्यात हसणं, निराशेत आशा नसण्यात असणं भावनेत आदर, जणू मायेची उब..प्रतिक्षा राकेशला आपल सुख, दु:ख सांगू लागली आपल मन त्याच्या जवळ हक्काने मोकळ करीत असे तो तिला मी आहे ना? असा नेहमीच म्हणायचा तिला धीर द्यायचा.. त्यांच्या नात्याचा गंध चोहिकडे पसरला त्याच्यासोबत जगणं म्हणजे तिला चंदेरी दुनियाच भासत होती. ते सुख ते प्रेम तिला घरी कधीच मिळले नव्हते.तिच्या जीवनात दु:खच दु:ख होते.कुणी तिच्या भावना समजून घेत नव्हते तिच अतिशय संघर्षमय जीवन होत.जेव्हापासून तिला राकेश भेटला तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावर हसू फुलल होत.त्याआधी तीला हसणं कस असत हेही ठाऊक नव्हतं..तसं तर राकेश व प्रतिक्षा यांच नातं म्हणजे एक अवघड प्रवासच पण ही वाट त्यांना अवघड कधीच वाटली नाही.

दोघांच्या सहवासाने हिरवळीतून जाणारीच भासली. नात्याच्या भावगर्भात काही नाती गुंतागुंतीची असली तरी ती ठळकच दिसतात. मनाशी जुळलेली नाती काळाच्या ओघात कधीच पुसली जात नाही.दोन मन गुंतली गेली..हृदयाची हृदयाशी कायम गाठ बांधली गेली. हे न तुटणारे रेशीम बंध अधिकच घट्ट झाले. राकेश व प्रतिक्षा जरी एकत्र आले नाहीत तरी एकमेकांच्या हृदयात आठवणीच्या रूपात आजही त्यांच प्रेम जीवंत आहे. एक नातं आपसूकच जुळलेल त्याला कुठलच नाव नाही तरी देखील मनात जपलेलं, वाटे हवहवस भासे आपलसं असच एक नातं बंधनापलिकडलं..!!

प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे