Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगविदर्भ

नागपूर फिल्म फेस्टिवलचा जाहीर निषेध

0 4 8 2 8 2

नागपूर फिल्म फेस्टिवलचा जाहीर निषेध

नागपूर: आपल्या नागपूर शहरामध्ये 11, व 12 जानेवारी ला चलचित्र फाऊंडेशन तर्फे *नागपूर फिल्म फेस्टिवल* होत आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक अश्या अवॉर्डेड फिल्म आहेत ज्यांचे इतर नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्शन होऊन अवॉर्ड मिळालेले आहेत परंतु नागपूरच्या या फेस्टिव्हलमध्ये साधे सिलेक्शनसुद्धा झालेले नाही. माझ्या अवॉर्डेड फिल्म प्रमाणेच, भारतातून ऑस्कर साठी नामांकनासाठी पाठविण्यात आलेला *”सायको – समजो तो..”* हा नागपूरच्या *निखील शिरभाते* या तरुण दिग्दर्शकाने नागपूर मध्येच बनविलेला लघुचित्रपट देश विदेशातील फिल्म फेटिव्हलमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केलेला असूनसुद्धा नागपूरच्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिलेक्ट होत नाही. ही अतिशय खेदाची व दुर्दैवी बाब आहे.
आमच्यासारख्या अवॉर्डेड किंवा भारताकडून ऑस्करसाठी पाठविण्यात आलेली फिल्म ही इथल्या ज्युरींना किंवा आयोजकांना भावली नाही किंवा या फिल्म सिलेक्ट होण्या योग्य वाटल्या नाहीत? का? तर फिल्म सिलेक्ट करण्यामागे जे ज्युरी कमिटीमध्ये बसलेले आहेत ते त्या योग्य आहेत का? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. कारण *अमीत गोनाडे* सारखा व्यक्ती ज्याला चित्रपट क्षेत्रातले काही देणे घेणे नसतांना फिल्मच्या निवड समितीमध्ये असतो. इतर सदस्यांबाबतही तसेच असणार. यावरून या फेस्टिवलच्या योग्यतेचा प्रश्न उपस्थित होतो. फेस्टिव्हल हे नवोदित कलावंतांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे माध्यम आहे. आयोजक जर निवड समितीमध्ये चित्रपट क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती ज्युरी म्हणुन घेत नसतील तर या फेस्टिवलचा दर्जा काय असणार. अश्या घटनेमुळे चांगल्या कलाकृती मागे पडतात. ही खुप मोठी शोकांतिका आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे