0
4
8
2
9
0
पोपटपंची
आमच्या शाळेतला गणू
पोपटपंची नेहमी करतो
कळत नाही शब्दांचा अर्थ
घोकंपट्टी केलेली विसरतो…!!
अर्थ समजून न घेताच
भरभर वाचतो धडे सारे
प्रश्न सोडवताना फजिती
कळेना उत्तर त्याला खरे…!!
वाचन वेग शंभरच्या पुढे
कसे राहील सांगा स्मरण
एकाग्रता नाही राहणार
होईल फक्त शब्द वाचन…!!
पोपटपंची केल्याने मग
निर्णय कसा घेता येईल
चुकीचा परिणाम नक्की
जीवनात आपल्या होईल..!!
वाचताना जागृत व्हावेत
विचार नि आपले अंतर्मन
सोडून निरर्थक पोपटपंची
विवेकबुद्धीने सुखी जीवन…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
4
8
2
9
0



