Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन

तीनविरा -वाघोली -वाघ्रण रस्ता बनला बेवारस

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 4

तीनविरा -वाघोली -वाघ्रण रस्ता बनला बेवारस

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग (दि.१४) रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित तीनविरा -वाघोली -वाघ्रण हा रस्ता आहे . . जिल्हा परिषदेने या रस्त्यावर गेल्या १० वर्षांhमध्ये दमडाही खर्च केलैला नाही . या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली आहे . मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांना प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदन देऊन कोणतीही कार्यवाही झालेली नाही .
तीनविरा – वाघोली – वाघ्रण हा खारेपाट विभागातील महत्त्वाचा रस्ता आहे . रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या व ७ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या दुतर्फा वाघोली , सिद्धार्थ नगर , विरवाडी , सुतारपाडा , खिडकी , लेभी, कोपर , भायमळा , बहिरमपाडा , कामार्ले , लोणघर , सातघर , वाघ्रण ही सुमारे ८ हजार लोकवस्तीची गावे वसली आहेत . पेण व पोयनाडकडून रेवस बंदराकडे जाण्यासाठी कार्लेखि़ड ऐवजी तीनविरा – वाघोली – वाघ्रण या रस्त्याने गेल्यास ७ कि. मी.’ अंतर वाचते. शिवाय वेळ व इःधनातही बचत होते . म्हणून वाहनचालक रेवसकडे जाण्यासाठी तीनविरा -वाघोली – वाघ्रण रस्त्याने जाणे पसंत करतात ..परिणामे सदर रस्त्याने वाहनांची सतत वर्दळ असते.परंतु या रस्त्याकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले आहे . दहा वर्षात दमडाही खर्च केलैला नाही .

या दुर्लक्षित रस्त्याची दुर्दशा संपण्यासाठी व्रुत्तपत्रात अनेक बातम्या प्रसिध्द झाल्या . पाच महिन्यांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर जिल्हा परिषदेच्या C. E. O.. नेहा भोसले यांना भेटले असता “सदर रस्त्याची तरित दुरुस्ती होईल” असे आश्वासन त्यांनी दिले . तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियःता दैवांग यांना भेटले असता “सदर रस्त्याची प्राधान्यानै दुरुस्ती केली जाईल ” असे सांगितले . त्यानंतर गणेशोत्सव झाला , दjसरा गेला , दिवाळीही संपली. पण रस्त्यावर खड्डे मात्र अधिकाधिक पडत वाढत आहेत रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे . सतत छोटे -मोठे अपघात होत आहेत . . ते टाळण्यासाठी या रस्त्याची दुर्दशा केव्हा संपेल ?

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे