
0
5
7
4
4
8
मुखवट्यांचे जग
मुखवट्यांचे जग हे सारे
ओठी एक पोटी एक
कुठे कसा शोधावा सांगा
खराखुरा माणूस नेक
मतलबी झाली दुनिया
भरला स्वार्थाचा बाजार
फक्त स्वहित पाहण्याचा
जडलाय इथे आजार
आवळा देऊन कोहळा
काढून घेतात सारे
पसरले चोहीकडे आता
केवळ मतलबाचे वारे
मुखावाट्या मागचा चेहरा
सांगा कसा ओळखावा
सत्तापिपासू सेवकांना
कसा आरसा दाखवावा
चेहरा एक मुखवटे अनेक
दाखविण्यात सारे दंग
सरड्यालाही लाजवील
असे बदलतात रंग
मुखवट्यांचे जग हे सारे
खऱ्याचे ना उरले नाव
स्वार्थ साधू सारे भोवती
खोट्यांचा चढला भाव
श्री. पांडुरंग घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
5
7
4
4
8



