Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

वळके येथे आगरी समाज संस्थेचे करिअर व AI मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 4 7 2 3

वळके येथे आगरी समाज संस्थेचे करिअर व AI मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी करणार वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

वळके (ता. मुरुड-जंजिरा): (दि २७) आगरी समाज संस्था (सार्वजनिक ट्रस्ट नोंदणी क्र. एफ–००१६२३७) तर्फे कोएसो नारायण कमळ्या गायकर हायस्कूल, वळके येथे आयोजित करण्यात आलेले करिअर व AI मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.

विद्यार्थ्यांना दहावी-बारावीनंतर योग्य करिअर निवडता यावे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या नव्या युगातील संधी व आव्हाने समजावीत, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात “स्वप्नपूर्ती : दहावी-बारावीनंतरचे लक्ष्य” या विषयावर विद्यार्थ्यांना विविध शिक्षण शाखा, करिअरचे पर्याय आणि योग्य नियोजनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच “AI : काल, आज आणि उद्या” या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व, फायदे-तोटे आणि भविष्यातील संधी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रो. मिलिंद प्रभाकर धोदरे (जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग) यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. तसेच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष मार्गदर्शक म्हणून श्री. संदेश म्हात्रे (जे.एस.डब्ल्यू., साळाव) यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करून त्यांना योग्य दिशा दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. संदेश म्हात्रे यांनी केली, तर सूत्रसंचालन सौ. दर्शना सातामकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. रमाकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी यामध्ये मोलाचे योगदान दिले. शेवटी त्यांनी आभार प्रदर्शनही केले. यावेळी सौ. दीप्ती पावरा, सौ. माधुरी पाटील, श्री. वंदेश तेलंगे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निडी गावचे पोलिस पाटील आणि माजी विद्यार्थी श्री. नितेश पाटील यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आगरी समाज संस्थेचे शैक्षणिक कार्यक्रम प्रमुख प्रो. मिलिंद धोदरे, कार्यकारिणी सदस्य श्री. संदेश म्हात्रे व सभासद श्री. इंद्रजित पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी पुढील संपूर्ण वर्षभर विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या कार्यकारी मंडळाने समाधान व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे