0
4
8
2
8
4
उशीखाली फोटो तुझा
विरहात तुझ्या गं राणी
आठवणींना देतो उजाळा
उशीखाली फोटो तुझा
पाहताक्षणी येतो उमाळा
पाहून तुझे रूप लोभस
भेटण्यास जीव तडफडतो
शराबी गं ओठ गुलाबी
डावा डोळा का फडफडतो
तुझ्याविणा वाटते कठीण
एकांती राहणे वैरागी बनून
उशीखाली फोटो तुझा गं
वाजवू कशी सांग प्रेमधून ?
उशीखाली फोटो तुझा
आठवण येताच गं पाहतो
अधीर मन होतं पाखरू
कासावीस गं अश्रू वाहतो
- प्रीतझुला सखे प्रीतवेडा
मनोमनी गं कसा झुरतोय
उशीखाली फोटो तुझा गं
पाहून शब्दफुले वाहतोयसंग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
0
4
8
2
8
4



