Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या बालकविता

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 2 4 7 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : गोळाबेरीज📘*
*🔸मंगळवार : ३१/ मार्च /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गोळाबेरीज*

एक दिवस बाई म्हणाल्या
आज वेगळा तास घेऊ
पाहता पाहता मार्च संपला
चला गोळाबेरीज पाहू.. //

परिपाठ अन् गृहपाठाच्या
जरा काढा बाहेर वह्या
बघूया बरं वेळच्या वेळी
मी केल्या आहेत का सह्या.. //

हस्ताक्षर, शुद्धलेखन
सुधारले आहे का बरे
कोणी कोणी मनापासून
बघू प्रयत्न केलेत खरे.. //

इतिहासातल्या सनावळ्या
गणित भूमितीची सूत्रे
झाले आहे का पाठांतर
लिहिली का मराठीत पत्रे.. //

हिंदी, इंग्रजीचा बागुलबुवा
सांगा गेला आहे का पळून
जोडशब्द, व्याकरण, लेखन
आता आले आहे का जुळून.. //

वार्षिक परीक्षा आली आता
पक्की करा उजळणी सारी
गोळाबेरीज करून बघूया
कुणाची किती झाली तयारी.. //

लक्ष देऊन ऐका मुलांनो
आता अभ्यास असा करा
प्रत्येकाच्या गुणपत्रिकेवर
मला दिसू दे “उत्तम” शेरा…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿
*गोळाबेरीज*

चला मुलांनो चला
खेळ मजेचा खेळू
खेळातले नियम सारे
प्रत्येकाने पाळू

शिकुयात बेरीज
जमवू गोट्या चिंचोके
खडे आणि काड्या
घेऊ डब्बीचे खोके

एकत्र जमवून सगळे
निवडून घेऊ वेगळे
मोजा आता जवळचे
गोळाबेरीज सगळे

देऊ पुन्हा वाटून
त्याच्याकडे असलेले
मोजून घेऊ आता
जवळचे किती गेलेले

बेरीज वजाबाकी
गुणाकार भागाकार
शिकून होईल सारे
वाटणार नाही भार

गोळाबेरीज शिकूया
वस्तूच्या मदतीने
हसत खेळत करू
पाठ पाढे आनंदाने

*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿
*गोळाबेरीज*

जात होतो शाळेत
शिक्षण मी घ्यायला
मधल्या सुट्टीत रोज
येई मजा खेळायला..१

बाई मला शिकवीत
अंक गणित समजावून
त्यासाठी जवळ घेत
खडे चिंचोके जमवून..२

गोळाबेरीज करायला
शिकत होतो पाटीवर
चुकते वेळी धपाटे
मिळत होते पाठीवर..३

अंक लिहून त्यावर
रचित होतो खडे
त्यातूनच मजेशीर
गिरवू लागलो आकडे..४

चार आले चार गेले
बाकी उरली शून्य
त्याला म्हणे भोपळा
केले आम्ही मान्य…५

भौमितिक आकृत्यांना
मिळाले विविध आकार
बेरीज वजा गुणासोबत
शिकलो मी भागाकार..६

अंकगणित शिकायला
मजा येई खूप सारी
आल्या आल्या वर्गात
पाढे म्हणत मूले भारी…७

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*©जिल्हा- नाशिक*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गोळाबेरीज*

चला मुलांनो आज शिकूया
मजेदार गणिताच कोडे
बजाबाकी ,भागाकार करू
ज्ञान घेऊया थोडे थोडे

मराठीचे व्याकरण पाठ
यमक,अलंकार, नाम
शब्दाचे भाव ओळखू
घरीच करू पाठांतर काम

इतिहासातल्या सनावळ्या
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
संस्कृत काव्य लेखन
भूगोलाचा भोगीलीक पठार

एप्रिल महिन्यात परीक्षा
तोंडी परीक्षा,गृहपाठ
प्रयोगवह्या गोळाबेरीज
सर्व झाले आपले पाठ

लेखी परीक्षेला तयार करू
उत्तर पत्रिका लिहू छान
गुण मिळवूया भरपूर
तरच मिळेल आपनास मान

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿
*गोळाबेरीज*

खाऊ वाटला, खेळ झाला।
खोडी काढून हशा फुलला।।
देणंघेणं चालू सारे मित्रांसंगे
हिशेब मात्र चोख जमला ।।२।।

“मी दिलं दोन, तू घेतलंस एक!”।
“मी दिलं तीन, तू घेतलंस केक!”।।
मोजता मोजता कळलं शेवटी।
गोळाबेरीज झाली शून्य नेक!।।३।।

क्षणभर कट्टी, लगेच दोस्ती।
पुन्हा सुरू झाली मस्ती।।
हसत-खेळत शिकले सारे।
गणिताची गोडीच जास्ती।।४।।

छोटे छोटे गणिती ज्ञानी।
मोठ्यांनाही करतील हैराणी।।
शून्य हिशेब, आनंद भारी।
हीच मुलांची दुनिया न्यारी!।।५।।

गोळाबेरीज कशीही करा।
हिशेब तरीही भारी।।
जैसे थे तैसेच राहते।
मजा मात्र दुप्पट सारी।।६।।

*श्री गणेश नरोत्तम पाटील(स्नेहवलयकार)*
ता.शहादा जि.नंदुरबार
*©सदस्य ,मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿
*गोळाबेरीज*

वीज बाईची आकाशात
छम छम छडी
झुक झुक धावते
आम्हा मुलांची गाडी

सर सर पावसात
वाहतो घों घों वारा
चला वेचायला जाऊ
थंड थंड गारा

शाळेच्या भोवती
गोल गोल तळे
तळ्याला मिळती
पाण्याचे ओढे

निसरडी वाट
रपारप पडले
शाळेतले विद्यार्थी
तरी नाही रडले

फाटक शाळेचे
बंदच बाई
गुरुजींना यायला
रस्ताच नाही

मुले हिरमुसली
करावे काय
गोळाबेरीज अभ्यासाची
अन् खेळाचे डाव

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक/ मुख्यपरीक्षक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿
*गोळाबेरीज*

एक आहे चिमणा आणि एक चिमणी
दोघे मिळून गाऊ लागले
चिव चिव गाणी…!!

एका टोपलीत दोन आंबे
दुसरीत दोन
दोन्ही टोपलीतले आंबे सांगतंय कोण..!!

पाच रंगीत फुले, दोन अजून फुलली
दोन्ही मिळून बघा सात फुले झाली…!!

सहा चिंचोके टोपलीत होते ठेवले
त्यात टाकले चार मिळून दहा झाले..!!

गणित आहे सोपे पण लक्ष देऊया रे
गोळाबेरीज शिकू हसत खेळत सारे…!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿
*गोळाबेरीज*

चला चला रे खेळायला
मुले झाली गोळा
किती मुले जमली
गोळाबेरीज करा

मुले खेळती विटी दांडू
कुणी घेतला हाती चेंडू
खेळाडू किती आलेत
गोळाबेरीज करा

बागेत गेली मुले
झाडाला होती फुले
वार्‍या संगे डुले
फुलांची गोळाबेरीज करा

नदी किनारी गेली मुले
जलात प्रतिमा खुले
जलात मासे आनंदी
गोळाबेरीज स्वच्छंदी

तरू जवळ गेली मुले
झाडावरती पक्षी फुले
किती पक्षी सुस्वरे
गोळाबेरीज करू बरे

*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*झिंगाबाई टाकळी, नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿
*गोळाबेरीज*

परीक्षा आली जवळ
आई सांगू नको काम
अभ्यास करून करून इथे
फुटला मला घाम .

सूत्रे पाठ करायची
तोंडी परीक्षेची तयारी
स्वाध्याय वही पूर्ण केली
आता कार्यानुभावाची बारी.

भाषण स्पर्धा खेळ
सर्वात भाग घेणार
आई मी बघ आता
वर्गात अव्वल येणार.

वर्षभराचे मूल्यमापन
गोळाबेरीज गुणांची
आमच्या बाई म्हणतात
श्रेणी ठरते मुलांची .

*सौ विमल धर्माधिकारी*
*ता वाई ,सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿
*गोळाबेरीज*

चिंटुच्या घरात कोण बरे
आई बाबा ताई भाऊ
नंतर मांडणी करू पाहू
आजी आजोबा आणि म्याऊ

आई चिंटूला बसवी देवाजवळ
शुभंकरोती कल्याणम सुरात
हात जोडूनी चिटू मांडी घालत
देवाला करती सांष्टाग नमस्कार

बाबा शिकवित इंग्रजी शब्द
ताईने शिकविली मराठी कवीता
अगबाई ढगबाई लागली कळ
ढगाला किती पाण्याची झळ

भाऊ शिकवित अंक आणि पाढे
चिंटू म्हणती मी सर्व विसरते
का बरे अंक जणू दिसे काळे
सांग दादा कसे ठेवू स्मरणात

आजोबा आजी सांगती गोष्ट
रामायण महाभारत सांगती
संत शिवाजी महाराजाची गोष्ट
चिंटू मन कान देऊन ऐकती

चिंटुची भर होई ज्ञानाची
कुंटुबच जोपासती मनाची
वाईट चांगल्या नात्याची
होईल गोळाबेरीज संस्काराची

*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😇🌀😇➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 7 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे