0
4
8
2
9
0
येरे येरे पावसा
येरे येरे पावसा
किती मारशील दडी
पिके लागली करपाया
ढगातून मार उडी…१
येरे येरे पावसा
पडशील माझ्या दारी
दांडी मारण्या शाळेला
मजा येते भारी…२
येरे येरे पावसा
वर्गाच्या खिडकीतून
खूप खूप ओले कर
पाझर साऱ्या भिंतीतून…३
येरे येरे पावसा
रोज सुटल्यावर शाळा
होड्या सोडण्या जाऊ
भरलेल्या ओहळा…४
येरे येरे पावसा
खूप कोसळ रानात
पिके डोलू लागली तर
हर्ष होईल मनात…५
माधुरी शेवाळे पाटील
जिल्हा नाशिक
=============
0
4
8
2
9
0



