आनंद नगर ‘एनआयटी गार्डन’मध्ये जागतिक महिला दिवस जल्लोषात
मोहिनी निनावे, नागपूर
आनंद नगर ‘एनआयटी गार्डन’मध्ये जागतिक महिला दिवस जल्लोषात
वृद्धाश्रमातील महिलांना प्रमुख पाहुण्यांचा मान
मोहिनी निनावे, नागपूर
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि १०): शहरातील आनंद नगरच्या एनआयटी गार्डन मध्ये (दि ९ मार्च) जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला वृद्धाश्रमातील महिलांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने जल्लोषाने आणि विविध खेळांनी रंगून यशस्वी झाला.
वृद्धाश्रमाच्या संचालिका तसेच सामाजिक कार्यकर्ता श्रीमती बेबीताई रामटेके यांनी वृद्धाश्रम सुरू करण्यामागचा संघर्ष सांगून महिलांना उपकृत केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ता श्रीमती अंजला उके यांनी आपल्या भारदस्त भाषणांमुळे महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. महिलांना वाचनासाठी प्रवृत्त केले. स्त्रीने फक्त स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी न जगता समाजासाठी सुद्धा जगले पाहिजे. समाज सुधारिका सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श पुढे ठेवत समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. हा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
स्वागत गीताने उपस्थित सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. नृत्य सादर करून लहान मुलींनीही त्यात सहभाग घेतला. त्यानंतर विविध खेळांनी हा कार्यक्रम रंगून गेला. सर्व महिलांनी खेळात उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक खेळात यशस्वी झालेल्या महिलांना उत्कृष्ट बक्षीस देण्यात आले. सगळ्यात शेवटच्या खेळात विजयी झालेल्या महिलेला पैठणी हे बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाची धुरा सांभाळणाऱ्या सर्व महिलांच्या मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. पुढच्या वर्षी हा कार्यक्रम असाच आणि याहीपेक्षा जास्त जल्लोषात करु असा सगळ्यांनी आग्रह धरला. जेवणानंतर महिलांच्या छान छान अभिप्रायाने या कार्यक्रमाची सांगता झाली.



