‘दोन शबूद आभाराचे…!’; वैशाली अंड्रस्कर
"जवा थे रायते तवा लय हरीक वाटते"
‘दोन शबूद आभाराचे…!’; वैशाली अंड्रस्कर
“जवा थे रायते तवा लय हरीक वाटते”
राम राम मंडळी, कसे काय असा तुमी…? मजेतच असालसा…आज लिवण्याचं कारण असं हाये की, बाबा, परवा आमी एक चितरचारोयी लिवली होती…’उरलेली प्रीत’, आता मनलं आपुन बी लिवावं कसी हायतं ‘सरलेली पीरीत’…!
पीरतीचं असं हाये का जवा थे रायते तवा लय हरीक वाटते. मन कसं वाऱ्यावर झुलते, आभायाले टेंगते, नदीनाल्यावानी झुयझुय वाह्यते पर एखांदी बार समाजाले भेऊन म्हना नायतं मजबुरी नं म्हना थे पिरीत तुटते तवा लय दुख होते आन् मंग थे सरलेली पिरीत कायजाचे तुकडे तुकडे करते…मंग कोनी देवदास व्हते कोनी पारू व्हते…पर जिंदगीत सावरसुत करणं गरजेचं हाय ना…म्हणूनशानी सरलेली पिरीत डोयात अन् मनात बी याद ठेऊनशानी नव्याने जिंदगानी सुरु करा लागते…व्हयं का नाय…? यास आसयाले धरुनशानी म्या चितरचारोयी लिवली आन् राहुलभाऊले पसंद पडली…सकायीच ‘तुमचा फटू धाडा’, असा मेशेज मले आला नं म्या देल्ला धाडून फटू…!
आता सर्वोत्कृष्ट का काय म्हंते त्याचं पोश्टर बनवूनशानी त्यायनी मराठीचे शिलेदार समूहामंदी छापलं बी….समद्यायनं झाडून पुसून माह्ये अभिनंदन केले बगा…पर म्या गेल्ती शिक्षक क्षमता वृद्धी कराले…आन् नाय कोनाले धन्यवाद बी म्हनलं नं थॅंकू बी मनलं…म्हणूनशानी ह्या आभाराचा परपंच… समजून घेजा समदेजण…आनिक राहुलभाऊ पाटील बी….लय लय धन्यवाद तुमचे. तं मंग आशीच किरपा आन् पिरती समदेझण माह्यावर राहू देजा आनी चुकलं भुललं माफ करजा…थांबतो आता लिवाचं…!
सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह



