Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजीनगरमराठवाडासाहित्यगंध

श्रावणी चाहूल

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 5 7 8 9 8

श्रावणी चाहूल

दणदणणारे घणघणणारे
माघारले आषाढ पाऊल
रूणझुणती रिमझीमशी
लागली श्रावणी चाहूल..//

रुद्रावतारी प्रलयंकारी
आता ओसरले महापूर
स्थिरावलेल्या प्रवाहाचे
खळखळती मंजुळ सूर..//

ऊन पावसाच्या खेळात
आसमंत ही झाला दंग
खुल्या नभात निखरले
सुरेख इंद्रधनूचे सप्तरंग..//

अवखळत्या वार्‍याची
झुळझुळती संथ लहर
सळसळत्या उत्साहाने,
डोलू लागले पर्ण बहर.//

हिरव्या साडी चोळीचा
वसुंधरेने केलाय शृंगार
अन् गर्भारल्या धरेच्या,
अंगोपांगी आला निखार..//

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 8 9 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे