0
4
8
2
9
7
श्रावणधारा
आला श्रावण महिना
बरसल्या सरीवर सरी
सजली सृष्टी जणूकाय
नववधू आली धरतीवरी
काय तो देखावा निसर्गाचा
बघा वनदेवताही नटली
शालु पांघरूनी हिरवाकंच
मातीचा सुगंध दरवळती
पावसाच्या धारा पडती
झरझर जमीनीवरती
भरले नदी,नाले तुडूंब
वार्यासंगे गवत डुलती
पानावर दवबिंदु होऊनी
मोत्याची माळ भासती
तुझ्या कळत नकळत येण्यानी
बळीराजाही सुखावती
नभी मेघ दाटुन पाहतो
होऊन मुक्त वाहतो वारा
इंद्रधनुष्य सप्तरंग उधळतो
जेव्हा येती श्रावणधारा
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
=========
0
4
8
2
9
7



