0
4
8
2
8
7
मनाचा आरसा
मनाचा आरसा पहा
किती असतो बोलका
सुखदुःखाचा साक्षीदार
भार करतो हलका
दिसत नसले तरी
कळते मनातले दुरून
प्रतिबिंबित चेहऱ्यावर
भाव येतात जुळून
हा मनाचा आरसा
असतो सत्याचा पुरावा
त्याच्या प्रांजळ मताने
का मग व्हावा दुरावा
असा मनाचा आरसा
राखतो भावनांचा समतोल
आयुष्यभर करतो सहाय्य
बोलतो परखड बोल
मनाचा आरसा नेहमीच
सांगतो मनातले गुपित
भावनांच्या कल्लोळात
काय हृदयाच्या कुपित
श्री.पांडुरंग घोलप
ता.जुन्नर जि.पुणे
=========
0
4
8
2
8
7



