
0
4
8
2
9
7
घाईत घाई
शाळा सुटली
टन टन टन
रांगा लागल्या
पटकन पटकन…
मुले निघाली
भर भर भर
घर गाठले
लवकर लवकर…
कपडे बदलले
वेगे वेगे वेगे
घेऊन निघाले
पतंग नि धागे…
मैदानावर आले
झप झप झप
मनाला आनंद
खूप खूप खूप…
घाईत घाई खेळाची
संध्याकाळ मौजेची
अंधार पडला लट लट लट
ओढ लागली घराची…
आशा गेडाम
वणी जि.यवतमाळ
0
4
8
2
9
7



