Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजन

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: शुक्रवार दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये पालक शिक्षक सभांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ सत्रात इ. ११ वी, इ. १२ वी मधील तर दुपार सत्रात इ. ५ वी ते इ. १० वी मधील विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या व पालकांच्या सभा स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या. दोन्ही सत्रात मुख्याध्यापक /प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी सभेचे प्रास्तविक केले व विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगती बाबत पालकांना मार्गदर्शन केले.

सकाळ सत्रात नितिन शिंदे सर यांनी तर दुपार सत्रात शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर यांनी एस. एस. सी. परीक्षा २०२५ व एच. एस. सी. परीक्षा २०२५ च्या निकालाचे वाचन केले. दोन्ही सत्रात वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांनी पालकांना आपला परिचय करून दिला. दोन्ही सत्रात शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ च्या पालक शिक्षक संघासाठी प्रत्येक वर्गातून पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली आणि पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली.

निवड झालेल्या वर्ग प्रतिनिधी पालकांचे स्वागत करण्यात आले. सकाळ सत्रात कैलास शिकारे सर यांनी विद्यालायात राबविण्यात येत असलेले विविध शालेय उपक्रम तसेच क्रीडा विषयक व विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत माहिती दिली. दुपार सत्रात आशिष राणे सर यांनी विद्यालायात राबविण्यात येत असलेल्या विविध शालेय उपक्रमांविषयी तसेच भूगोल प्रज्ञाशोध केंद्र,नवी मुंबई यांच्या मार्फत होणाऱ्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेविषयी पालकांना माहीती दिली.

सकाळ सत्रात धनराज फड सर यांनी तर दुपार सत्रात सुनिल मोरे सर यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना व शिष्यवृत्ती परीक्षांबाबत पालकांना माहिती दिली.
दुपार सत्रात पल्लवी पाटील मॕडम यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्या मार्फत होणाऱ्या हिंदी परीक्षेविषयी पालकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले.

दुपार सत्रात यतिश शिंदे सर यांनी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेबाबत पालकांना माहिती दिली. दुपार सत्रात प्रियंका राणे मॕडम यांनी पालकांना क्रीडाविषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले. दुपार सत्रात दिव्या भगत मॕडम यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत व विद्यार्थीनींच्या समस्यांबाबत पालकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले.

दोन्ही सत्रात सभेमध्ये शिक्षक व पालक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने चर्चा केली. पालकांनीही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने आपली मते मांडली.सकाळ सत्रात दत्तात्रेय अहिरे सर यांनी सभेचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले. दुपार सत्रात सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी सभेचे सुत्रसंचलन तर दिलीप चव्हाण सर यांनी सभेचे आभार प्रदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे