0
4
8
3
0
0
जगू द्या रे…..
युद्ध प्रारंभले
माहामारी झाली
अपघातांची तर
शृंखला लागली ।।
दाही दिशा
रक्ताळल्या इथे
रक्त सांडले कुठे….
कुणी ना जाणले ।।
माणुसकी हरवली
नीतिमत्ता ढासळली
मानव जातीची……
पुरती वाट लावली ।।
स्वार्थी जग हे
कुणा ना कळले
सार्यांस दुःखाच्या
गर्तेत ओढले ।।
आतातरी सारे
वाद संपू द्या रे
मानवास सुखाने
आयुष्य जगू द्या रे ।।
कंचना मंडपे
जि.नागपूर
=========
0
4
8
3
0
0



